नवी दिल्ली : देशातील कृषी क्षेत्रासाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सून सामान्य राहील, अशी शक्यता स्कायमेट वेदर’ या हवामान संस्थेने तसेच भारतीय हवामान खात्याने अंदाज व्यक्त केली आहे. यावर्षी ९६ टक्क्यांपासून १०३ टक्क्यांपर्यंत पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. नैऋत्य मान्सूनमध्ये दीर्घकालीन सरासरीनुसार ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांसह देशातील या तीन नेत्यांना कोरोनाची लागण #surajyadigital #सुराज्यडिजिटल #Yediyurappa #BSYeddyurappa #HarsimratKaurBadal #कोरोना #DighvijayNews #दिग्विजय #randeep #suraj pic.twitter.com/exJbYhQSaZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 16, 2021
येणारा पावसाळा सलग तिसऱ्या वर्षी देशभरात समाधानकारक असेल, असा अंदाज ‘स्कायमेट वेदर’ या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. मंगळवारी स्कायमेटने मान्सूनच्या दीर्घकालीन अनुमानाविषयी ऑनलाइन पत्रकार परिषदेमध्ये याविषयी माहिती दिली. सन २०२१ मध्ये सरासरीच्या १०३ टक्के (+/- ५ टक्के) पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये सरासरीइतका पाऊस पडेल, असाही अंदाज आहे.
Forecast for the 2021 South-west Monsoon Rainfallhttps://t.co/Ixqf1jWTTf pic.twitter.com/qUBjpK87TG
— India Meteorological Department (@Indiametdept) April 16, 2021
जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरी ८८०.६ मिलिमीटर पाऊस पडतो. या काळात यंदा ९०७ मिलिमीटर पाऊस पडू शकेल. स्कायमेटने जानेवारीमध्ये वर्तवलेल्या अंदाजामध्येही यंदा पाऊस सरसरीइतका पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्या संदर्भात मंगळवारी अधिक माहिती देण्यात आली. येत्या पावसाळ्यामध्ये देशाच्या उत्तर भागात काही ठिकाणी, तसेच ईशान्येकडे काही भागांत कमी पावसाची शक्यता आहे. कोकणात सरासरीहून पाऊस कमी असू शकेल. कर्नाटकाच्या अंतर्भागांमध्येही जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडू शकेल, अशी शक्यता आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि सप्टेंबरमध्ये देशातून माघार घेत असताना संपूर्ण देशात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मान्सूनच्या मध्यावर एन्सोचा प्रभाव वाढेल. मध्य प्रशांत महासागराचे तापमान थंड होऊ लागेल. मात्र, हा परिणाम फार मोठा नसेल. त्यामुळे मान्सूनदरम्यान एल निनो स्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी सांगितले. इंडियन ओशन डायपोल तटस्थ असून, याचाही फारसा प्रभाव मान्सूनवर पडणार नाही अशी शक्यता आहे. मान्सूनवर मेडन-ज्युलिअन ऑस्सिलेशन (एमजेओ) या घटकाचाही प्रभाव असतो. मात्र, सध्या या संदर्भात कोणतेही भाष्य करता येणार नसल्याचे स्कायमेटकडून सांगण्यात आले.
मोठी बातमी! Citibank गुंडाळणार भारतातील व्यवसाय ! , या परदेशातही होणार बंद https://t.co/k14VyOm4Fv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 16, 2021
ओडिशा, झारखंड, पूर्व यूपीत कमी पाऊसओडिशा, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये सामान्यपेक्षा कमी तर देशातील उर्वरीत भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यंदा देशात मान्सूनच्या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरीच्या 98 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशात सामान्यपेक्षा जास्त पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. ला निना आणि एल निनोचा भारतीय मान्सूनच्या वाटचालीवर मोठा परिणाम होत असतो. यंदा एल निनोच्या प्रभावाची शक्यता कमी असल्याचे राजीवन म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक असलेल्या कृषी क्षेत्राच्या दृष्टीने मान्सूनची वाटचाल अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे मान्सूनचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम दिसून येतो.
भयंकर ! पुन्हा 2 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण https://t.co/KEz2qc0dqp
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 16, 2021
* महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस
यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रात मागच्या वर्षीही चांगला पाऊस पडला होता. यंदाही त्याहून चांगली परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सोबतचं दुष्काळी भागांनाही याचा चांगला फायदा होणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.