पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात दररोज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यात पोलिसांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथे कोविड हाॅस्पिटल तयार करण्यात आले आहे.
भयंकर ! पुन्हा 2 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण https://t.co/KEz2qc0dqp
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 16, 2021
हे हॉस्पिटल अवघ्या ३८ तासात डब्ल्यू आर ग्रुप ऑफ बिजनेस साताराचे रोहन वाघमारे व त्यांच्या अभियंते व कर्मचारी टीमने अहोरात्र काम करत हॉस्पिटल तयार करून दिले आहे. बुधवारी (ता. १४ एप्रिल) रोजी पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या हस्ते अॉनलाईन या हाॅस्पीटलचे उद्घाटन झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या हास्पिटलमध्ये प्राधान्याने पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार करण्यात येणार आहेत. मागील महिनाभरापासून पंढरपूर पोटनिवडणुकीचा बंदोबस्त पोलीस करीत आहेत. याचबरोबर सध्या शासनाने संचारबंदी लागू केली असून निवडणूक संपताच पोलिसांना संचारबंदीसाठी पुन्हा बंदोबस्त करावा लागणार आहे. यामुळे अनेकांच्या संपर्कात येवून अनेक पोलिसांना कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी त्यांच्यावर वेळेत उपचार होण्यासाठी हे हास्पिटल उभे करण्यात आले आहे.
सोलापुरात कोरोना बळीचे 'रेकॉर्डब्रेक'; एकाच दिवसात 30 जणांचा मृत्यू https://t.co/DxcC3PpR26
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 16, 2021
सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे हाॅस्पीटल सुरु करण्यात आले आहे. यामध्ये पोलीसांवर मोफत उपचार होणार आहेत. तसेच सामान्य नागरिकांवर देखील सवलतीच्या दरात या हास्पिटलमध्ये उपचार होणार आहेत. हे हाॅस्पिटल उपचारासाठी सज्ज झाले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.