मुंबई : अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने ट्विट करून ही माहिती दिली आहे. सध्या तो होम क्वारंटाईन आहे. तसेच माझ्या संर्पकात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करावी आणि काळजी घ्यावी, असे आवाहन त्याने केले आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात गेल्या वर्षी सोनूने अनेक मजुरांना स्वखर्चाने त्यांच्या घरी पोहोचवले होते. आताही तो अनेक गरिबांच्या मदतीला धावून येतो.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1383336735816380421?s=19
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. सोनू सूद हा विलगीकरणात उपचार घेत आहे. सध्या त्याची प्रकृती नीट असल्याची माहिती मिळत आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1383329483436920837?s=19
नमस्कार, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर मी स्वत: क्वारंटाईन झालो आहे. चिंतेचे कोणतेही कारण नाही. उलट आता माझ्याकडे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी पहिल्यापेक्षा जास्त वेळ आहे. लक्षात ठेवा, कोणतीही समस्या असली, तरी मी तुमच्यासोबत सदैव आहे, असे ट्वीट सोनू सूद याने केले आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
https://twitter.com/SonuSood/status/1383327054087614472?s=19
बॉलिवूड विश्वात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सोनू सूदने खऱ्या आयुष्यात मात्र नायकाची भूमिका बजावली आहे. कोरोना महामारीच्या काळात स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला धावून आलेल्या सोनूने सगळ्याच गरजवंतांची वेळोवेळी मदत केली. स्थलांतरितांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्यापासून सुरू झालेला त्याचा हा मदतीचा ओघ आता बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1383299443806539777?s=19
कोरोना काळात जगातील अनेक लोक चिंताग्रस्त होते. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सोमोरे जाण्याची वेळ आली होती. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, काही जणांवर तर उपाशी राहण्याची वेळ देखील आली होती. या काळात सोनू सूदने लोकांना मदतीसाठी हात पुढे केला होता. लाखो लोकांना त्याने कोरोना काळात मदत केली. तसेच आताही तो अनेकांची मदत करतो. अनेक लोक त्याच्याकडे अनेक प्रकारची मदत करतात.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1383282363602399232?s=19
लॉकडाऊनमध्ये घडलेल्या घटनांवर सोनू सूदने एक पुस्तक लिहिल्याचे कळते आहे. त्याच्या या पुस्तकाचे नाव ‘आय ॲम नो मसीहा’ असे असणार आहे. डिसेंबरमध्ये हे पुस्तक चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सध्या सोनू सूद ‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.