मुंबई : कोरोनामुळे मंदावलेली हवाई वाहतूक फेब्रुवारी महिन्यात पूर्वपदावर येताना कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांनी पुन्हा विमान प्रवासाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. एप्रिलच्या पहिल्या १५ दिवसात देशांतर्गत विमान प्रवाशांमध्ये १२ टक्के घट नोंदविण्यात आली. तर येत्या १५ दिवसात दिल्ली आणि मुंबई या विमानतळांवरील निर्बंधांमुळे येथील प्रवाशांच्या संख्येत १५ ते १७ टक्के घट होण्याचा अंदाज आहे.
सीआयएससीई बोर्डाच्या परीक्षाही स्थगित, सात राज्यातील परीक्षा पुढे ढकलल्या https://t.co/YsIumrvEb5
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिलच्या पहिल्या पंधरावड्यात देशांतर्गत विमान प्रवाशांत १२ टक्के घट नोंदविण्यात आली. मार्च २०२० मध्ये भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंर विमान वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले. २५ मेपासून हे निर्बंध शिथिल करून देशांतर्गत विमान वाहतूक टप्प्याटप्प्याने खुली करण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध राज्यांनी कठोर निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रात तर पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. संचारबंदीमुळे नागरिकांनीही अनावश्यक प्रवास टाळला आहे. शिवाय मुंबई, दिल्ली आणि गोवा या वर्दळीच्या विमानतळावर नियमावली कडक केल्याने प्रवासी संख्येत घट झाल्याचे वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले.
पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी आज चुरशीने मतदान होत आहे. #surajyadigital #voting #पंढरपूर #सुराज्यडिजिटल #मतदान #पोटनिवडणूक pic.twitter.com/TvvCwsYZjb
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
डिसेंबरपासून प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊ लागली. फेब्रुवारी महिन्यात एकूण देशांतर्गत विमान वाहतूक गेल्यावर्षीच्या तुलनेत ६४ टक्के इतकी नोंदविण्यात आली होती. परंतु, मार्चपासून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यामुळे पुन्हा प्रवासीसंख्या रोडावली आहे.
सोलापूर शहरात सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंतच अत्यावश्यक दुकाने राहणार खुले https://t.co/h1Hkn8x3AO
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 16, 2021
‘आयसीआरए’ या संस्थेच्या अहवालानुसार, मार्च २०२१ मध्ये दिवसाला सरासरी २ लाख ४९ हजार प्रवाशांनी देशांतर्गत विमान प्रवास केला. मात्र ६ एप्रिलपासून सातत्याने प्रवासी संख्या कमी होत असून, गेल्या १५ दिवसांत त्यात ११ ते १२ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. विशेषतः दिल्ली आणि मुंबई या वर्दळीच्या विमानतळांवर लागू केलेल्या निर्बंधांमुळे पुढील १५ दिवसांत देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत १५ ते १७ टक्के घट होण्याचा अंदाज आहे.