चेन्नई : प्रसिद्ध तमिळ अभिनेते विवेक यांचे निधन झाले आहे. त्यांनी चेन्नईच्या रुग्णालयात आज अखेरचा श्वास घेतला. त्यांना काल शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आला होता. ते 59 वर्षांचे होते. संगीतकार ए. आर. रहमान यांच्यासह फिल्मी दुनियेतील दिग्गजांनी विवेक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 1980 मध्ये विवेक यांनी चंदेरी दुनियेत पाय ठेवला. यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.
अभिनेते विवेक यांनी अनेक तामिळ सिनेमात काम केलं. ते कॉमेडी भूमिकाही छान करायचे. त्यांनी फिल्मी करिअरमध्ये अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं. त्यात रजनीकांत, कमल हसन, अजित, विजय, माधवन, विक्रम या स्टार्सचा समावेश आहे. माधवनची फिल्म रन ही विवेक यांची सर्वात मोठी फिल्म मानली जाते. सिनेमातल्या योगादानासाठी विवेक यांनी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं होतं.
विमानतळांवरील निर्बंधांमुळे प्रवाशांच्या संख्येत घट https://t.co/bRNisGOf6x
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
चेन्नईच्या एका खासगी रुग्णालयात विवेक यांचे निधन झालं आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 16 एप्रिलला त्यांना हार्ट अटॅक आला होता. कोरोना वॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर अभिनेते विवेक यांचं निधन झालं आहे. त्यामुळे हार्ट अटॅक आणि कोरोनाचं काही नातं आहे का याच्यावरही आता पुन्हा चर्चा सुरु झालीय. दरम्यान विवेक यांच्या अकाली एक्झिटनं टॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
15 एप्रिलला त्यांनी सरकारी दवाखान्यात जाऊन मित्रासोबत कोविडचा पहिला डोस घेतला. त्यानंतर 16 एप्रिलला त्यांना हार्ट अटॅक आला. चेन्नईच्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये विवेक यांना भरती करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना ECMO ट्रिटमेंट सुरु केली. ते ICU मध्येच डॉक्टरांच्या निगराणीखाली होते. विवेक यांची तब्येत गंभीर होती. शेवटी पहटे 4.45 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
सीआयएससीई बोर्डाच्या परीक्षाही स्थगित, सात राज्यातील परीक्षा पुढे ढकलल्या https://t.co/YsIumrvEb5
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
विशेष म्हणजे अभिनेते विवेक यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलऐवजी सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. Omandurar इथं हा डोस घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी चर्चाही केली होती. लस घेतल्यानंतर विवेक म्हणाले होते, मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोविड लस घेणं एकदम सेफ आहे. ही लस घेतली तर आपण आजारी पडणार नाही का, असं तुम्हाला वाटत असेल, पण तरीही लक्ष ठेवावंच लागेल. वॅक्सिनमुळे आपली रिस्क कमी होईल हे मात्र निश्चित, असे म्हणला होता.