सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोलापूर रेल्वे विभागाकडून कोच अर्थात बोगीत आयसोलेशन वॉर्डची निर्मिती केली आहे. या निर्मितीसाठी 57 कोच सोलापुरात दाखल झाल्या आहेत. यामध्ये 513 रुग्णांची व्यवस्था होणार असून, याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
पद्मश्रीप्राप्त, प्रसिद्ध तमिळ अभिनेते विवेक यांचे निधन
https://t.co/Ywp0y4Qr4r— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
देशात कोरोना महामारीमुळे 23 मार्च 2020 पासून लॉकडाउन करण्यात आला होता. त्या दिवसापासून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत गेली. वाढती रुग्णसंख्या पाहून रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोगीत आयसोलेशन कोच बनविले होते. मात्र मागील वर्षी या कोचचा वापर झाला नाही. मागील वर्षी तयार करण्यात आलेले रेल्वेचे आयसोलेशन कोच वापराविना धूळखात पडून होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मागील वर्षी तयार केलेले कोच सोलापूर विभागात आणि अन्य ठिकाणी आहे तशाच स्थितीत ठेवण्यात आलेले आहेत. सर्व डबे एकत्र करून डब्यांची पाहणी करण्यात येणार आहे. तर काही डब्यांची दुरुस्ती करून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी दिले जाणार आहेत.
शहरातील हॉस्पिटल्समधील बेडची संख्या कमी पडत असल्याने रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा त्या कोचची तयारी सुरू केली आहे. सोलापूर विभागात देखील मागील वर्षी पंढरपूर, कलबुर्गी, दौंड आदी ठिकाणी तयार करण्यात आलेले रेल्वेचे आयसोलेशन कोच ठेवण्यात आले होते.
"महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवाल तर परवाना रद्द करू” https://t.co/iBOXFoaPqb
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे सोलापूर विभागात विविध ठिकाणी ठेवण्यात आलेले रेल्वेचे आयसोलेशन कोच एकत्र करण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे.
आरोग्य विभागात 10 हजार 127 पदांसाठी तातडीने होणार भरती https://t.co/kJgO1PdS4W
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021