सोलापूर / पंढरपूर : पंढरपूरमध्ये आज शनिवारी (ता. १७) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. राष्ट्रवादीचे आमदार दिवंगत भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूरमध्ये एक जागा रिक्त झाली होती. याच जागेवर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली होती.
पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी आज चुरशीने मतदान होत आहे. #surajyadigital #voting #पंढरपूर #सुराज्यडिजिटल #मतदान #पोटनिवडणूक pic.twitter.com/TvvCwsYZjb
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
या पोटनिवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई झाली असल्याचे पहायला मिळाले. राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके म्हणजेच दिवंगत भारत भालके यांचे सुपुत्र यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून समाधान आवताडेंना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीचा संपूर्ण पाठींबा राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना आहे. पंढरपूरमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ७ वाजेपर्यंत सरासरी ६४ टक्के मतदानाची नोंद झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंढरपूर पोटनिवडणुकीच्या रिंगणात एकूण १९ उमेदवार उतरले आहेत. मात्र यातील मुख्य निवडणुकीचे आकर्षण हे भाजप आणि राष्ट्रवादीत आहे. राष्ट्रवादीसाठी पंढरपूर निवडणूक प्रतिष्ठेची ठरत आहे. तर भाजपनेही आपली ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीत दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान झाले होते. मतदानाच्या दिवशी नागरिकांध्ये प्रचंड उत्साह पाहण्यास मिळाला आहे.
मोठा दिलासा; मोदी सरकारने Remdesivir केले स्वस्त https://t.co/vuXvPVTfCK
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
कोरोनाचे संकट घोंघावत असले तरी सूज्ञ नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत मतदानाचा हक्क बजावला आहे. तर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनीही मतदान केले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवर भगीरथ भालके यांनी देखील सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे.
* सायंकाळची आकडेवारी
आतापर्यंत १७८१९० पैकी १ लाख ३ हजार ६४१ पुरुषांनी मतदान केले आहे. तर १६२६९४ पैकी ९३ हजार ४१४ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. असे एकूण १ लाख ९७ हजार ५५ नागरिकांनी मतदान केले आहे. ही आतापर्यंतची आकडेवारी असून संध्याकाळी ७ पर्यंत मतदानाची वेळ असल्यामुळे अंतिम आकडेवारी मतदान संपल्यानंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.