मुंबई : विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करणारा अव्यवहार्य व गोंधळास निमंत्रण देणारा आदेश महाराष्ट्र सरकारने दिला होता. मात्र, अखेर तो मागे घेण्यात आला आहे.
आयपीएल : विराट कोहलीच्या बंगळुरुचा सलग तिसरा विजय
https://t.co/0JrQSCNeUt— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021
आरटीपीसीआरला ॲन्टीजेन चाचणीचा पर्याय देण्यात आला आहे. दुकानातील नोकर, सामान घरपोच करणारे कर्मचारी, रिक्षा व टॅक्सीचालक अशा अनेक वर्गातील, कोरोना लस न घेतलेल्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले होते.
सोलापुरातून पुरवला जातोय रेमडेसिवीरसाठी कच्चा माल https://t.co/oDbk44neXB
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021
दुकानातील नोकर, सामान घरपोच करणारे कर्मचारी, रिक्षा व टॅक्सीचालक अशा अनेक वर्गांतील, काेरोना लस न घेतलेल्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले होते. तसेच त्याची वैधता १५ दिवस ठरविण्यात आली होती. ही चाचणी न करता काम करताना आढळलेली व्यक्ती किंवा आस्थापने यांना मोठा दंड लावण्याची तरतूद नियमांत होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र, सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंत्रणांवर असलेला ताण, चाचण्यांची क्षमता आणि अहवालाची १५ दिवसांची वैधता याबाबत आरोग्य विभागासमोर माेठे आव्हान आहे. याचा विचार करून अखेर आरटीपीसीआर चाचण्यांचा निर्णय मागे घेण्यात आला.
जेईई मेन 2021 परीक्षा पुढे ढकलली https://t.co/BzHzTyAUMv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021
* निर्णयामुळे यांना मिळाला दिलासा
आरटीपीसीआर चाचणीची सक्ती नाही, या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतूक, खासगी वाहतूक, चित्रपट, जाहिरात आणि चित्रवाणी मालिकांसाठी चित्रीकरण करणारे कर्मचारी, होम डिलिव्हरी सेवा कर्मचारी, परीक्षा कार्यातील सर्व कर्मचारी, लग्न समारंभातील कर्मचारी, अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी, खाद्यविक्री करणारे, कारखान्यातील कामगार, ई-कॉमर्समधील व्यक्ती, बांधकाम क्षेत्रातील कर्मचारी आदी सर्वांना दिलासा मिळाला आहे.