मुंबई : वीज ग्राहकांना धक्का देणारी बातमी आहे. या महिन्यापासून वाढीव दराने वीजबिल भरावे लागणार आहे. निवासी ग्राहकांसाठी स्थिर आकार ( फिक्स चार्जेस ) वाढवण्यात आले आहेत. सरसकट २ रुपये आणि स्लॅबनुसार प्रतियुनिटमध्ये दरवाढ लागू करण्यात आली आहे. महावितरणने वीज नियामक आयोगापुढे सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर ही वाढ झाली आहे. दरम्यान ‘वर्क फ्रॉम होम’मुळे निवासी विजेचा वापरही वाढला आहे.
"संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या, हे मोदींच्या भाषणाचे सार" https://t.co/SJyftiiGuv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021
कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कठोर निर्बंध लागू झाले असून, पुन्हा एकदा अनेक ठिकाणी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झाले आहे. संचारबंदीमुळे कुटुंब घरात कैद झाली आहेत. उन्हाळा घामाघूम करत आहे. परिणामी विजेच्या उपकरणांचा वापर वाढला असतानाच आता १ एप्रिलपासून निवासी ग्राहकांच्या स्थिर आकारासह स्लॅबनुसार प्रतियुनिट वाढ झाली आहे. त्यामुळे विजेचा वाढलेला वापर आणि वीज दरात झालेली वाढ वीज ग्राहकांना शॉक देणारी आहे.
धर्म माणुसकीचा ! ६० हिंदू लोकांवर मुस्लीम तरुणांनी केले अंत्यसंस्कार, रोजा ठेवूनही सकाळपासून हॉस्पिटल ते स्मशानभूमीवर फेऱ्या https://t.co/3AHCSusyGl
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021
वीज नियामक आयोगाकडे दाखल झालेल्या प्रस्तावास मान्यताही मिळाली आहे. बहुवार्षिक वीज दरवाढीच्या प्रस्तावानुसार दरवर्षी १ एप्रिल रोजी वीज दरवाढ लागू करण्याचे अधिकार महावितरणकडे आहेत, त्यामुळे आता याच कारणामुळे १ एप्रिलनंतर येणारी वाढीव वीज दराची बिले वीज ग्राहकांना शॉक देणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
५०० युनिटच्या पुढे वीज वापर असलेल्या ग्राहकांचा स्थिर आकार दर १०० वरून १०२ रुपये केला आहे. काेराेनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी ‘वर्क फ्राॅम हाेम’ सुरू असून उकाड्यामुळे वीज वापर वाढला आहे. त्यामुळे उन्हासह वाढीव बिल घाम काढणार असल्याची नाराजी ग्राहकांमध्ये आहे. सर्वसामान्यांना याचा कोणताही फटका बसणार नाही. उच्च वीज वापरकर्त्यांना याची झळ बसेल. शिवाय ही वाढ फार मोठी नाही, असे महामंडळाचे म्हणणे आहे.
सर्व शब्द झेलत होतास..हा शब्द का ओलांडलास…पंकजा मुंडे कोणामुळे झाल्या इतक्या भावूक https://t.co/5MWUT0dA8A
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021
१ ते १०० युनिट विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रतियुनिट ३ रुपये ४४ पैसे मोजावे लागतील. जुना दर ३ रुपये ४६ पैसे आहे. म्हणजे या वर्गवारीतील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. १०१ ते ३०० युनिटमधील ग्राहकांना ७ रुपये ३४ पैसे मोजावे लागणार. जुना दर ७ रुपये ४३ पैसे आहे. म्हणजे यांनाही झळ बसणार नाही.
मेकअप खराब होईल म्हणून मास्कचं लावला नाही; नवरीचा मेकअप पडला महागात https://t.co/UzwGKmgq3h
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021
३०१ ते ५०० युनिटमधील ग्राहकांना १० रुपये ३६ पैसे मोजावे लागतील. जुना दर १० रुपये ३२ पैसे आहे. येथे मात्र ग्राहकांना वाढीव बिल भरावे लागेल. ५०० आणि त्या पुढील युनिटच्या ग्राहकांना ११ रुपये ८२ पैसे मोजावे लागतील. जुना दर ११ रुपये ७१ पैसे आहे.