भोपाळ : मध्य प्रदेशच्या भोपाळ येथील दानिश सिद्दीकी व सद्दाम कुरेशी या तरुणांनी कोरोनाच्या भीतीला माणुसकीच्या भावनेने मात दिलीय. दोन्ही तरुण आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाने मरणाऱ्या हिंदू लोकांवर अंत्यसंस्कार करत आहेत. आतापर्यंत दानिश व सद्दाम या दोघांनी जे लोक कोरोनाच्या भीतीने अंत्यसंस्काराला येत नाहीत किंवा कोरोना नियमामुळे अंत्यसंस्कारास पोहचू शकत नाहीत. अशा ६० हिंदू लोकांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
नाशिकमध्ये ऑक्सिजनअभावी 22 जणांचा मृत्यू, 11 जणांची नोंद https://t.co/r6JDs6ocZv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र भयावह रूप सध्या भारतात पहायला मिळत आहे. दररोज लोक आपल्या आप्तांना मरताना बघत आहेत. स्थिती अशी झाली आहे की, जिवंत लोकांना उपचारासाठी हॉस्पिटल आणि मृतांना स्मशान मिळत नाहीये. त्यावर आणखी एक प्रश्न म्हणजे कोरोना महामारीच्या भीतीने लोक त्यांच्या नातेवाईकांवर अंत्यसंस्कारही करत नाहीये.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अशीच स्थिती आहे. येथील दानिश सिद्दीकी आणि सद्दाम कुरेशी सारखे तरूण कोरोनाच्या भीतीला माणुसकीच्या भावनेने मात दिली आहे. भोपाळमध्ये राहणारे दोन्ही मुस्लिम तरूण आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाने मरणाऱ्या हिंदू लोकांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत.
नाशिक दुर्घटनेतील मृत्यूचा आकडा गेला 24 वर, मात्र चालूय 'राजकारण', विरोधी पक्षनेत्यांचे वक्तव्यातून आले समोर #nashik #lackofoxygen #24death #नाशिक #24मृत्यू #surajyadigital #सुराज्यडिजिटलhttps://t.co/Z5CXYIFVwf
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021
मीडिया रिपोर्टनुसार, दानिश आणि सद्दामने आतापर्यंत कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या ६० हिंदू लोकांवर अंत्यसंस्कार केले आहेत. हे ते लोक आहेत ज्यांच्या घरचे लोक संक्रमणाच्या भीतीने अंत्यसंस्कारला येत नाहीयेत किंवा कोरोनाच्या नियमामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास पोहोचू शकत नाहीयेत.
दोघेही गेल्या काही दिवसापासून दिवसरात्र हे काम करत आहे. इतकंच काय तर रोजा ठेवला असूनही ते सकाळपासून हॉस्पिटल ते स्मशानभूमीवर फेऱ्या मारत आहेत. ते जाती-धर्म न बघता अंत्यसंस्कार करत आहेत. दानिश आणि सद्दाम यांनी हे दाखवून दिलं आहे की, माणूसकीपेक्षा मोठा कोणता धर्म नाही.