नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज शिखर धवनने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात मोठा विक्रम केला. धवनने सलामी फलंदाज म्हणून ५००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याने ही कामगिरी १६० डावात केली. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात धवनने 45 धावांची केली होती. दरम्यान, या सामन्यात दिल्लीने मुंबईचा पराभव केला.
Aadmi kitne bhi ho, Gabbar sirf ek hai @BoatNirvana 🎧 #SoundOfChampions. https://t.co/TMWwwzRQk1 pic.twitter.com/ciozGjYWsX
— Shikhar Dhawan (@SDhawan25) April 19, 2021
यंदाच्या आयपीएलमध्ये रोज नवनवीन विक्रम खेळाडूंच्या नावावर होत आहेत. असाच एक विक्रम दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन याने आपल्या नावावर करुन घेतला आहे. काल मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबईचा ६ गडी राखून पराभव केला होता . या सामन्यात शिखर धवन याने ४५ धावांची छोटी पण महत्वपूर्ण खेळी केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सनरायझर्स हैदराबादचा सूर्योदय, यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय https://t.co/wGOR5OA2EE
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
शिखर धवनने ४५ धावांच्या आपल्या खेळीत सलामी फलंदाज म्हणून ५००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच त्याने यंदाच्या मोसमात ऑरेंज कॅपसुद्धा आपल्या नावावर केली आहे जी सर्वात जास्त रन्स करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. आयपीएलच्या इतिहासात सलामीवीर म्हणून ५००० धावांचा टप्पा पार करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
Wonderful start in Chennai 😁 Team effort 🙌 @DelhiCapitals pic.twitter.com/8dAkvvnLKA
— Shikhar Dhawan (@SDhawan25) April 20, 2021
अजूनपर्यंत कोणत्याच सलामवीराला अशी कामगिरी करता आलेली नाही. शिखर धवन आयपीएलमध्ये मुंबई, हैदराबाद, डेक्कन चार्जर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या चार संघांकडून खेळला आहे. हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर या विक्रमात दुसऱ्या स्थानी आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नावावर ४६९२ धावा आहेत. पंजाबचा फलंदाज ख्रिस गेल तिसऱ्या स्थानी आहे त्याच्या नावावर ४४८० धावा आहेत. धवनचा हा रेकॉर्ड मोडणे यंदाच्या आयपीएलमध्ये तरी अशक्य दिसत आहे.