चेन्नई : IPL 2021 मध्ये दिल्ली- हैदराबाद यांच्यातल्या सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हर मध्ये लागला. हैदराबादने सुपर ओव्हरमध्ये 7 धावा केल्या होत्या. दिल्लीने 8 धावांचं आव्हान 6 चेंडूत पूर्ण केलं. तत्पूर्वी, दिल्लीने हैदराबादला 160 धावांचं आव्हान दिलं होतं. याचा पाठलाग करताना हैदराबादला विजयासाठी 1 चेंडूत 2 धावांची आवश्यकता होती. मात्र हैदराबादला शेवटच्या चेंडूवर 1 धाव मिळाली. त्यामुळे सामना टाय झाला होता.
हैदराबादने दिल्लीला विजयासाठी सुपर ओव्हरमध्ये 8 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान दिल्लीने सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर पूर्ण करत विजय साकारला. त्याआधी दिल्लीने हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 159 धावांवर रोखल्याने सामना बरोबरीत सुटला. हैदराबादकडून केन विलियमसनने सर्वाधिक नाबाद 66 धावा केल्या. तर दिल्लीकडून अवेश खानने 3 अक्षर पटेलने 2 विकेट्स घेतल्या. या सामन्याचे आयोजन चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारताला कोरोना लशीच्या उत्पादनासाठी कच्चा माल देण्यास अमेरिका तयार https://t.co/JI87xt17kz
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021
दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ ला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. पृथ्वीने 39 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 53 धावांची खेळी केली. दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामना टाय झाला आहे. हैदराबादला विजयासाठी 1 चेंडूत 2 धावांची आवश्यकता होती. मात्र हैदराबादने 1 धावच काढली. त्यामुळे सामना टाय झाला आहे. यामुळ सुपर ओव्हरद्वारे सामन्याचा निकाल लावण्यात आला. हैदराबादला विजयासाठी 1 चेंडूत 2 धावांची आवश्यकता होती.
RISHABH'S IN 💙💙💙
WHAT. A. WIN. #YehHaiNayiDilli #IPL2021 #SRHvDC
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 25, 2021
सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादवर मात केली आहे. दिल्लीला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 8 धावांची आवश्यकता होती. या विजयी आव्हानाचे पाठलाग करण्यासाठी दिल्लीकडून शिखर धवन आणि कर्णधार रिषभ पंत खेळायला आले होते. दिल्लीला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 1 धावेची आवश्यकता होती. दिल्लीने यशस्वीरित्या ही एक धाव काढली. यासह दिल्लीने हैदराबादवर सुपर ओव्हरमध्ये मात केली. रिषभ पंतने सुपर ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावला आहे.