कोपरगाव : भाजपचे अत्यंत निष्ठावान कोपरगाव शहरचे माजी शहराध्यक्ष प्रा. सुभाषचंद्र आनंदराव शिंदे यांनी मंगळवारी आत्महत्या केली. शिंदे यांनी राहत्या घरात पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही. दरम्यान, त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. परंतू पोलिसांनी याबाबत माहिती देण्यास टाळले आहे.
महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार, पुढच्या काही तासात राज्यात पाऊस बरसणार https://t.co/4uwxf5dqWB
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021
प्रा. शिंदे यांचे राज्यभरातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी व्यक्तिश: जवळचे संबंध होते. त्यांच्या आत्महत्येमुळे भाजप वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोपरगाव शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. सुभाषचंद्र आनंदराव शिंदे ( वय ७५ ) यांनी मंगळवारी (ता. २७) सकाळी १० वाजेच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, एक मुलगी, दोन नातवंडे असा परिवार आहे.
नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह, नवरा- नवरीने पीपीई कीट घालून केले लग्न, पहा व्हिडिओ https://t.co/U4FEOKJnWK
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021
प्रा. शिंदे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी त्यांनी सून वर्षा शिंदे यांच्या खबरीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान प्रा. शिंदे यांच्या खिश्यात एक चिट्टी सापडली आहे. त्यामध्ये नेमके काय लिहिले आहे, या संदर्भात पोलिसांनी माहिती देण्यास टाळले असून त्यानुसारच पुढील तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले आहे.
कोरोनामुळे नव्हे तर तोट्यामुळे सुमारे 18 प्रवाशी रेल्वे गाड्या आजपासून 11 मे पर्यंत रद्द, सोलापूर – मुंबईचाही समावेश https://t.co/SXIbrvd6hr
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021