नवी दिल्ली : देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. तसेच ऑक्सिजन आणि बेडचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. मोदींनी पीएम केअर फंडातून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कंटेनरला मंजुरी दिली आहे. आज (बुधवार) झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच पोर्टेबल ऑक्सिजन कंटेनर लवकर खरेदी करून गरज असलेल्या राज्यांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना मोदींनी दिल्या.
#ayushmankhurana सीएम कोव्हिड 19 रिलीफ फंडमध्ये अभिनेता आयुषमानची मदत https://t.co/bOwyulcilj
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
देशात ऑक्सिजनचा तुटवडा कमी करण्यासाठी आज बुधवारी एक मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा कमी होण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. देशात १ लाख ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्सची खरेदी करण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला आहे. या खरेदीसाठी पीएम केअर्स फंडातूनच तरतूद करण्यात आली आहे.
राजीव सातव यांची प्रकृती गंभीर; डॉक्टरांची टीम पुण्याला जाऊन उपचार करणार, राहुल गांधींचा पुण्यातील डॉक्टरांना फोन #RajivSatavhttps://t.co/A48Ys9T4vi
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
पीएम केअर फंडातून ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स आणि पीएस प्लॅन्ट उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. सहज वाहतूक करण्यासारखे हे ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स हे ऑक्सिजन तुटवडा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. देशात संरक्षण संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) ने विकसित केलेल्या ५०० पीएस ऑक्सिजन प्लँटला पीएम केअर्स फंडअंतर्गत मंजुरी मिळाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सर्वांना मोफत कोरोना लस, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मात्र मे महिन्याच्या शेवटी लसीकरण सुरू होणार https://t.co/Sv9pKKCLZD
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत एक महत्वाचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. कोविड व्यवस्थापनासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन पुरवठा सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ऑक्सिजन पुरवणारी ही उपकरणे लवकरात लवकर खरेदी करून ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णाची संख्या मोठी आहे अशा राज्यांना पुरवण्याच्या सूचना पंतप्रधानांनी केल्या. त्यामुळे ५०० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पीएम केअर्स फंडा अंतर्गत याआधी मंजूर करण्यात आलेल्या 713 पीएसए ऑक्सिजन प्लँट आणि 500 नव्या प्रेशर स्विंग एबझॉरब्शन ( पीएसए) ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स पीएम केअर्स फंडाअंतर्गत मंजुर करण्यात आले आहेत. सहज वाहून नेण्याजोग्या ऑक्सिजन उपकरणांची खरेदी आणि पीएसए प्लॅन्टच्या उभारणीमुळे ऑक्सिजन पुरवठ्यात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लॅन्ट ते रुग्णालय यादरम्यान ऑक्सिजन वाहतुकीच्या सध्याच्या आव्हानाची दखल घेतली जाणार आहे.
राज्यातील बारावीच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय https://t.co/G5a64roQAg
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021