नवी दिल्ली / लंडन : ‘देशातील अनेक मुख्यमंत्री व उद्योगपती फोन करत आहेत, आम्हाला कोरोना लस मिळावी, यासाठी दबाव टाकत आहेत, यांना धमक्या म्हणणं फार साधी गोष्ट ठरेल, त्यांची भाषा खूप विचित्र आहे’, असा धक्कादायक आरोप सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी टाईम्स युकेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. पण त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. सध्या पुनावाला हे कुटुंबियांसह लंडनला गेले आहेत. लसीचे उत्पादन परदेशात करण्याचा विचारही ते करत आहेत.
जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनींपैकी एक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांना लसींसाठी मोठ्या प्रमाणात फोन येत आहेत. तसेच काही जणांकडून धमक्याही दिल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मला येणारे फोन कॉल्स अत्यंत वाईट बाब आहे. फोन करणाऱ्यांमध्ये प्रतिष्ठित लोकांचा समावेश देखील आहे, असं अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन https://t.co/IrVidbQuuB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021
सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ब्रिटनच्या द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, आम्हालाच सर्वात अगोदर लस मिळावी या मागणीसाठी गेल्या काही दिवसात त्यांना देशातल्या अनेक पॉवरफुल लोकांचे सतत फोन येत आहेत. त्यात काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. अनेक उद्योग समूहांचे प्रमुख आहेत आणि इतर श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. त्या फोन कॉल्सचं स्वरुप कधी कधी धमक्यांचंही असतं. मार्टिन फ्लेचर यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सीरमतर्फे लवकरच देशआबाहेर लशीची निर्मिती कऱण्याचे नियोजन असल्याचीही माहिती दिली. अदर पुनावाला हे सध्या ब्रिटनमध्ये आहेत.
सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी कोरोना लशीच्या उत्पादनाचा प्रचंड दबाव असल्याचं म्हटलं आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत रौद्र रुप घेऊन आली, त्यामुळं कोविशिल्ड लसीच्या वाढलेल्या मागणीची पूर्तता करताना प्रचंड तणावात असल्याचं त्यांनी म्हटलं.
रशियाची 'स्पुटनिक V' – सर्वात प्रभावी कोरोना लस भारतात दाखल https://t.co/5iGNwk9FMS
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021
भारतात त्याच परिस्थितीत परतायची इच्छा नसल्यामुळं लंडनमध्ये अधिक काळ राहत असल्याचं पुनावाला म्हणाले आहेत. सर्वकाही माझ्या खांद्यांवर येऊन पडलं आहे, पण मी एकटा काहीही करू शकत नाही. तुम्ही तुमचे काम करत असताना केवळ एखाद्या अमक्या, तमक्याच्या गरजा पूर्ण करू शकला नाहीत म्हणून ते काय करतील याची तुम्हाला कल्पनाही नसेल अशा परिस्थितीत परतण्याची इच्छा नसल्याचं त्यांनी मुलाखतीत म्हटलं आहे. हिंदुस्तान टाईम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
Adar Poonawalla: ‘The calls come from some of the most powerful men in India…‘Threats’ is an understatement….The level of expectation and aggression is really unprecedented. It’s overwhelming. https://t.co/MzamnEbZGK
— nikhil wagle (@waglenikhil) May 1, 2021
प्रत्येकाच्या खूप अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्याची आक्रमकताही तशीच आहे. प्रत्येकाला वाटते त्यांना लस मिळावी. पण एखाद्याला आधी का मिळायला हवी हे कोणीही समजून घेत नसल्याचं पुनावाला म्हणाले. भारताबाहेरही लसीचं उत्पादन सुरू करता यावं हेही त्यांचं लंडनला येण्यामागचं एक कारण असल्याचंही त्यांनी सांगितलं. याबाबत पुढील काही दिवसांत घोषणा होईल असंही ते म्हणाले.
उच्च न्यायालयाने दिल्ली आणि केंद्र सरकारला परखड शब्दांमध्ये फटकारले; पाणी डोक्यावरून गेलंय, आजच्या आज अॉक्सिजन पुरवाhttps://t.co/gNCJKw9moW
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021
* वाय प्रकारची सुरक्षा प्रदान
सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीनं देशात कोविशिल्ड या लशीची निर्मिती केली जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर लशीची मागणी अचानक प्रचंड वाढली. यादरम्यान देशातल्या काही अत्यंत शक्तीशाली लोकांचे फोन आले. त्यांची भूमिका अत्यंत आक्रमक होती, असं पुनावाला यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. गेल्या आठवड्यातच पुनावाला यांना सरकारनं वाय प्रकारची सुरक्षा प्रदान केली होती. या संपूर्ण परिस्थितीत निर्माण झालेल्या दबावामुळं पुनावाला हे लंडनला त्यांच्या पत्नी आणि मुलांबरोबर वेळ घालवायला गेले असं त्यांनी सांगितलं.
गुजरात : भरुचमध्ये कोविड सेंटरला भीषण आग; 18 रुग्णांचा मृत्यू https://t.co/FlFNXeu9Bh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021
* वर्षभरात इंग्लंडसह 68 देशांत पुरवठा
सीरम इन्स्टिट्यूटने वर्षभरात लस उत्पादनाची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. तसंच मोठ्या प्रमाणावर साठाही तयार केला. जगात इंग्लंडसह 68 देशांत आम्ही लसीचा पुरवठा सुरू केला. पण गेल्या काही आठवड्यांत भारताची स्थिती प्रचंड खराब झाली. एवढं वाईट होईल हे देवालाही माहिती नसेल असंही पुनावाला म्हणाले. लसीच्या किंमतीबाबत बोलताना ही आजही सर्वात स्वस्त लस असल्याचं म्हटलं. तसंच इतिहासात याबाबत काय बोललं जाईल याची वाट पाहीन असंही ते म्हणाले. आम्ही लसी तयार करतो म्हणून आम्हाला जबाबदारीची जाणीव आहे. पण आम्हीही लोकांचे जीव वाचवण्यासाठी यापूर्वी कधी लसी बनवल्या नव्हत्या असंही पुनावाला म्हणाले.