मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन झाले आहे. त्यांनी ‘डॉन’, ‘मर्डर 2’, ‘क्रिएचर’, ‘पेज 3’, ‘आरक्षण’ या चित्रपटात भूमिका केल्या. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ते सैन्यात होते. ते मुळचे हिमाचल प्रदेशातील होते. ’24’, ‘क्राईम पेट्रोल दस्तक’, ‘अदालत’, ‘दिया और बाती हम’, ‘सियासत’, ‘ये है चाहतें’, ‘स्पेशल ओपीएस’ या मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला. वेब सीरिजमध्येही काम केले.
देशात कोरोनानं अक्षरशः थैमान घातलं आहे. रुग्णसंख्येतील वाढीसोबतच मृतांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात आता बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनानं निधन झालं आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
Unpredictable shocking news I just got, one more super talented and wonderful person and most of all prolific actor just passed away. May his soul rest in peace. 🙏 #BikramjeetKanwarpal #RIP Bikramjeet Kanwarpal pic.twitter.com/Sx9biTimgx
— Jyoti Pandey (@JyotiPa03043212) May 1, 2021
बिक्रमजीत कंवरपाल 2002 साली मेजरच्या पदावरून सेवानिवृत्त झाले. यानंतर 2003 मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पेज 3, रॉकेट सिंग, आरक्षण, मर्डर 2, 2 स्टेट्स आणि गाझी अॅटॅकसारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरेंकडून अभिवादन https://t.co/GhuL4rWIAf
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बिक्रमजीत कंवरपाल यांचा हिमाचल प्रदेशमध्ये जन्म झाला. त्यांचे वडील द्वारकानाथ कंवरपाल हेदेखील सैन्यात अधिकारी होते. बिक्रमजीत यांना अभिनयाची आवड असल्यानं सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या काळात त्यांनी आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
गुजरात : भरुचमध्ये कोविड सेंटरला भीषण आग; 18 रुग्णांचा मृत्यू https://t.co/FlFNXeu9Bh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021
चित्रपटांशिवाय त्यांनी अनेक दिया और बाती हम, ये हैं चाहते आणि दिल तो दिल हैं यासारख्या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. हॉटस्टारच्या Special Ops या वेबसीरिजमध्ये ते शेवटचं झळकले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक उत्तम अभिनेता गमावल्याचं म्हणतं हळहळ व्यक्त केली आहे. सिनेसृष्टीतील कलाकारांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पाच राज्यांत कोण मारणार बाजी ? उद्या निकाल #results #five #State #surajyadigital #राज्य #निकाल #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/gmTbpuCCrw
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021