नवी दिल्ली : रशियाने तयार केलेल्या कोरोनावरील ‘स्पुटनिक V’ लशीची पहिली खेप भारतात दाखल झाली आहे. हैदराबाद विमानतळावर आज लशीचे 1 लाख 50 हजार डोस पोहोचले. ही लस जगातील लशींपेक्षा खूप प्रभावी आहे आणि नवीन स्ट्रेनविरोधातही परिणामकारक आहे, असे रशियाच्या भारतातील राजदुतांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लेबोरेटरीजने रशियासोबत या लशीसंदर्भात करार केला आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन https://t.co/IrVidbQuuB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021
भारतात, आजपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील तिसर्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात मोठ्या संख्येने लोकांनी नोंदणी केली आहे. मात्र लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण मोहिमेला बऱ्याच ठिकाणी खंड पडला. तरी रशियन लस स्पुटनिक V भारतात दाखल झाल्याने लसीकरण कार्यक्रम वेगाने सुरु होण्याची अपेक्षा आहे.
The first consignment of Sputnik V vaccines from Russia arrive in Hyderabad pic.twitter.com/LoQOTAXOtz
— ANI (@ANI) May 1, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना संकट आणि त्यात लसीचा तुटवडा या संकटाच्या काळात देशासाठी चांगली बातमी आली आहे. रशियन लस स्पुटनिक V लसीची पहिली खेप शनिवारी हैदराबादला पोहोचली आहे. रशियावरुन खास विमानाने स्पुटनिकची ही लस हैदराबादला दाखल झाली आहे. कोरोना व्हायरसविरूद्ध ही लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. या लसीचे डोस उपलब्ध झाल्याने लसीकरणाला गती मिळणार आहे. लसीकरणाला गती देण्यासाठीच केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी स्पुटनिक V लसीला आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.
काही दिवसापूर्वी ‘स्पुटनिक व्ही’ लसीला भारताच्या DCGI ची मंजुरी मिळाली होती. आणि स्पुतनिक V वापराला मान्यता देणारा भारत हा 62 वा देश ठरला. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड’ या लसीच्या वितरणासाठी असलेल्या कंपनीने भारतात डॉक्टर रेड्डीज लॅब सोबत करार केला आहे. पहिल्या खेपेत दीड ते 2 लाख डोस सध्या भारतात आल्याची माहिती मिळतेय. मात्र मे महिन्याच्या शेवटपर्यंत 30 लाख डोस भारतात येण्याची शक्यता आहे.
गुजरात : भरुचमध्ये कोविड सेंटरला भीषण आग; 18 रुग्णांचा मृत्यू https://t.co/FlFNXeu9Bh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021
रशियाची स्पुटनिक V ही जगातील पहिली लस आहे. 11 ऑगस्ट 2020 रोजी रशियाने या लसीची नोंदणी केली होती. ही लस गॅमलेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडोमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने विकसित केली आहे.
पाच राज्यांत कोण मारणार बाजी ? उद्या निकाल #results #five #State #surajyadigital #राज्य #निकाल #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/gmTbpuCCrw
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021