सोलापूर / पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. भाजपने या ठिकाणी विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भागीरथ भालके यांचा पराभव केला आहे. भालके यांना 1 लाख 7717 ते मिळाली. तर आवताडे यांना 1 लाख 94450 मते मिळाली आहेत.
पंढरपूरचा निकाल – ठाकरे सरकारला धक्का, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया; राजू शेट्टींनी मतदारसंघ पिंजून काढला पण, उमेदवाराला आणि अभिजित बिचकुलेंना डिपॉझिट वाचवणे अवघड
https://t.co/xYcRH4WKDG— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत पंढरपूरकरांनी राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे 3716 मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. पंढरपूरमध्ये झालेला पराभव हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.
शरद पवार, संजय राऊत यांनी केले ममता दीदींचे अभिनंदन, नंदीग्राममधून ममता बॅनर्जी 3 हजार 372 मतांनी आघाडीवर
https://t.co/9IcNpFx2ZL— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक पार पडली. ही पोटनिवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक केली होती. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत ‘तुम्ही भाजपच्या उमेदवाराला जास्त मत देऊन यांचा करेक्ट कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा कार्यक्रम करतो’ असं आवाहन केलं होतं. अखेर फडणवीसांच्या आवाहनाला पंढरपूरकारांनी हाक देत राष्ट्रवादीला आस्मान दाखवले आहे.
समाधान आवताडेंच्या घरासमोर भाजपा समर्थकांचा निकालाआधीच विजयी जल्लोष, परिचारक यांनी पंढरपुरात चांगली मोट बांधली https://t.co/FaMSecl2J2
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
समाधान आवताडे यांनी 3716 मतांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि भारत भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. टपाली मतदानात समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती. मधल्या काही फेरीत आवताडे हे मागे पडले होते. पण समाधान आवताडे यांनी नंतर आघाडी घेतली ती 36 व्या फेरीपर्यंत कायम राहिली. नंतर याचे रुपांतर विजयात झाले आहे.
पंढरपूर विधानसभा – राष्ट्रवादीला धक्का, भाजप पुढे; 4100 मतांची आघाडी, पंढरपूर शहर व तालुक्यातील मतमोजणी संपली; मंगळवेढ्यातील मतमोजणीला सुरुवात
https://t.co/GMHEo4yr9K— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
भगीरथ भालके आणि समाधान आवताडे यांच्यामध्ये कडवी झुंज सुरू होती. कधी राष्ट्रवादी पुढे तर कधी भाजप आघाडी घेत होती. एकूण 38 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण झाली. 7 व्या फेरीपासूनच समाधान आवताडे यांनी जोरदार मुसंडी मारली आणि मोठी आघाडी मिळवली. अखेरच्या फेरीअखेर समाधान आवताडे यांना विजयी घोषित करण्यात आले. राष्ट्रवादीने पंढरपूरमध्ये झालेला पराभव स्विकारला आहे. हा धनशक्तीचा विजय असल्याची टीकाही राष्ट्रवादीचे नेते लतिफ तांबोळी यांनी केली.
पंढरपूर पोटनिवडणूक : राष्ट्रवादी पिछाडीवर तर भाजपचे आवताडे 4100 मताने पुढे #पंढरपूर #pandharpur #Byelection #surajyadigital #सुराज्यडिजिटल #NCP #भाजपा pic.twitter.com/6KpEZx3agP
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
* दिग्गज नेत्यांनी मतदारसंघ पिंजून काढला
मतदार संघाची एकूण मतदार संख्या तीन लाख 40 हजार 889 एवढी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही या मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री बच्चू कडू, गुलाबराव पाटील यांसह अन्य मंत्र्यांनी वारंवार सभा घेतल्या. तर समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आमदार राम सातपुते, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनीही मतदारसंघ पिंजून काढला.
भाजपाचे समाधान आवताडे सात ते बारा फे-यांमध्ये आघाडीवर, पंढरपूर शहरात मुसंडी https://t.co/usjxJaOLi5
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
* एकूण 65.73 टक्के झाले मतदान
या निवडणुकीत एकूण 65.73 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये मतदारांनी स्व. भारत भालके यांची आमदारकीची गादी भगीरथ भालके यांच्याकडेच सोपवली की मंगळवेढ्यातील 35 गावच्या पाणी प्रश्नासाठी मतदार समाधान आवताडे यांच्या बाजूने उभे राहिले, याचा फैसला आज मतमोजणीतून झाला आहे. यात राष्ट्रवादीला नाकारुन भाजपला विजयी केले आहे.
* ‘शिवसेना, राष्ट्रवादीला दुसऱ्याच्या लग्नात नाचण्याची ‘सवय’
शिवसेना आणि राष्ट्रवादीला दुसऱ्याच्या लग्नात नाचण्याची आधीपासून सवय आहे, असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बाहेरच्या राज्यांच्या राजकीय घडामोडींवर बोलण्याइतपत त्यांची उंची नाही. प्रचाराला जाण्याची घोषणा केली. त्यानंतर पवार साहेब आजारी असल्यामुळे प्रचाराला जावू शकले नाहीत. शिवसेनाही तिथे उमेदवार उभे करणार होती पण ते उमेदवार उभे करु शकले नाहीत, असेही ते म्हणाले.
पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपाचे समाधान आवताडे यांना 2295 मतांची आघाडी #surajyadigital #पोटनिवडणूक #सुराज्यडिजिटल #Byelection #pandharpur #पंढरपूर #भाजपा #NCP pic.twitter.com/UizMugk1N7
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
* प्रत्येक फेरीमध्ये दोन्ही उमेदवाराला मिळालेली मते
– पहिल्या फेरीत भाजपचे समाधान आवताडे ४५० मतांनी आघाडीवर
– दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे 114 तर भगीरथ भालके 114 मतं, समसमान मतं
– तिसऱ्या फेरीत 635 मतांनी भगीरथ भालके पुढे
– 4 थ्या फेरीअखेर समाधान आवताडे 11303, भगीरथ भालके 11941, भालके 638 ने आघाडीवर
– 5 फेऱ्या पूर्ण भगीरथ भालके 521मतांनी आघाडीवर.
– 7 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 100मतांनी आघाडीवर.
– 8 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 2295मतांनी आघाडीवर
– 11 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1503मतांनी आघाडीवर.
– 12 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1409मतांनी आघाडीवर
– 16 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1411 मतांची आघाडीवर
– 17 व्या फेरी अखेर ९०१ मतांनी भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर
– 18 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1209 मतांनी आघाडीवर
– 19 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1022मतांनी आघाडीवर
– 21 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 3486मतांनी आघाडीवर
– 22 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 3908 मतांनी आघाडीवर
– 23 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 5807 मतांनी आघाडीवर
– 25 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 6200मतांनी आघाडीवर
– 36 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 4256 मतांनी आघाडीवर
– भाजपचे समाधान आवताडे 3716 मतांनी विजयी
गोकुळ दूध संघावर कुणाची सत्ता? आज मतदान, मंगळवारी निकाल https://t.co/UNWkC8nCro
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021