नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवली. मात्र, तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममधून पराभव झाला. यानंतर उलटसुलट चर्चा सुरुय. निकालात छेडछाड केल्याचा आरोप तृणमूलकडून केला जातोय. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी “पश्चिम बंगालमध्ये सबंध देशाच्या सत्तेला पराभूत व्हावं लागलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण सध्या तिथे रडीचा डाव सुरु आहे, अशी टीका केली आहे.
रडीचा डाव!
बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 2, 2021
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा विजय पक्का झालाय. राज्यात पुन्हा एकदा सद्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याच नेतृत्वाखाली सत्ता स्थापना होणार असंच निकालातून स्पष्ट होतंय. नंदीग्राममध्ये मुख्यमंत्री – तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार ममता बॅनर्जी आणि ममतांचे एकेकाळचे सहकारी – भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यात अत्यंत चुरशीची लढाई पाहायला मिळाली. या मतदारसंघात निर्माण झालेल्या गोंधळावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याला ‘रडीचा डाव’ असं म्हटलंय.
डहाणू- काँग्रेसचे माजी खासदार दामोदर बारकू शिंगडा यांचे निधन https://t.co/TF1PU7IupB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
‘रडीचा डाव! बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल!’
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नंदीग्राममध्ये अगोदर ममता बॅनर्जी यांच्या विजयाचं वृत्त ‘एएनआय’ दिलं होतं. मात्र, सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना १६२२ मतांनी पराभूत केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. तर अद्याप मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचा दावा तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला. अखेर ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्याचं जाहीर करण्यात आलंय. ममता बॅनर्जींचा भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्याकडून १७३६ मतांनी पराभव झालाय.
शिवसेनेला धक्का; उमेदवार पराभूत, महाराष्ट्र एकिकरण समितीला नवसंजीवनी https://t.co/wHs1ruLJ8e
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
एकूणच राज्यातील तृणमूलची कामगिरी चांगली उल्लेखनीय आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला १४७ चा आकडा गाठणं गरजेचं होतं. तृणमूल काँग्रेसनं बहुमताचा हा आकडा सहजच पार केलाय. तृणमूल काँग्रेस २१५ जागांवर आघाडीवर आहे तर भाजप ७४ आघाडीवर असल्याचं यावेळेला दिसतंय. लवकरच अंतिम निकालही जाहीर होईल.
मोठा उलटफेर, ममता बॅनर्जी हरल्या; कार्यकर्त्यांना मोठा धक्का https://t.co/1U60Sj4D3w
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
* अनेक नेत्यांनी दीदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयासाठी ममता बॅनर्जी यांच्यावर देशभरातील मोठमोठ्या नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आरजेडी नेते तेजस्वी यादव, सपा नेते अखिलेश यादव, जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांच्यासहीत अनेक नेत्यांनी दीदींना विजयाच्या शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलंय.