नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचं चित्र दिसत आहे. या निकालावरून अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला. ‘डन अँड डस्टेड! प्रिय सर्वोच्च नेते, द्वेष आणि विषाणू पसरवणं थांबवा. नागरिकांना स्पष्टपणे म्हटलं आहे. चांगली दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरूस्त करायला लागा’, असं प्रकाश राज यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.
शरद पवार, संजय राऊत यांनी केले ममता दीदींचे अभिनंदन, नंदीग्राममधून ममता बॅनर्जी 3 हजार 372 मतांनी आघाडीवर
https://t.co/9IcNpFx2ZL— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. भाजपने 200 जागा जिंकण्याचा दावा केला होता. मात्र निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल असं चित्र आहे. या निकालावरून प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.
#KhelaHobe done n dusted ..Dear supreme leader.. citizens have called the bluff .. enough of spreading HATRED and VIRUS.. have a good shave n start undoing what you have done. 🙏🏻🙏🏻🙏🏻LIVES MATTER #justasking pic.twitter.com/C22JivuYRn
— Prakash Raj (@prakashraaj) May 2, 2021
डन अँड डस्टेड! प्रिय सर्वोच्च नेते, द्वेष आणि विषाणू पसरवणं थांबवा. नागरिकांना स्पष्टपणे म्हटलं आहे. चांगली दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरूस्त करायला लागा, असं प्रकाश राज यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. पश्चिम बंगालमधील विजयासाठी भाजपनं जोर लावला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
Congratulations…You have WON @MamataOfficial didi.. you have WON BIGGGG by kicking the air out out these communal..hate mongering ..bigots.. you stand tall.. more power to you #justasking pic.twitter.com/tfLVuIKQej
— Prakash Raj (@prakashraaj) May 2, 2021
भाजपच्या जागा जरी वाढताना दिसत असल्या तरी तृणमूल काँग्रेसची सत्ता कायम राहणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. ममता बॅनर्जी निवडणुकीला उभ्या असलेल्या जागेवर अनेकांचं लक्ष आहे. या ठिकाणी ममता बॅनर्जी विजयी होणार का की सुवेंदु अधिकारी ममता बॅनर्जींचा पराभव करणार हे पाहावं लागणार आहे.
मोठा उलटफेर, ममता बॅनर्जी हरल्या; कार्यकर्त्यांना मोठा धक्का https://t.co/1U60Sj4D3w
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
दरम्यान, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ आणि आसाम या राज्यांमध्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये भाजपने आसाममध्ये सत्ता आणण्यात यशस्वी असलं तरी सर्वांचं लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमध्ये मात्र मोदी-शहांची जादू चालली नाही.
अभिनेते कमल हासन यांचा १७०० मतांनी पराभव https://t.co/uAyAGhX6Of
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021