चेन्नई : पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत उतरलेले एमएनएम पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते कमल हासन यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कमल हासन यांचा तामिळनाडूच्या कोईम्बतूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. भाजप उमेदवार वनाथी श्रीनिवासन यांनी १७०० मतांनी ही जागा जिंकली. दरम्यान तामिळनाडूमध्ये द्रमुक सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांचीच सत्ता स्थापन होणार, हे जवळपास निश्चित आहे.
चांगली दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरूस्त करा : प्रकाश राज https://t.co/2v65Njz4nI
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
कोरोना महामारीच्या सावटामध्ये ४ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभांसाठी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी रविवारी झाली. मतदारांनी कोणाला कौल दिला, हे उघड झाले आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या.
तामिळनाडूच्या इतिहासात यंदाच्या निवडणुकीला मोठं महत्त्व आहे. कारण, पहिल्यांदाच एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय ही विधानसभा निवडणूक पार पडत आहे. त्यातच, सुपरस्टार अभिनेता कमल हसन यानेही या निवडणुकीत एंट्री घेतली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
येथील निवडणुकीत एडीएमने भाजपासोबत आघाडी केली असून डीएमके स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे.
सुरुवातीला हाती आलेल्या आकडेवाडीनुसार एम. के. स्टॅलीन यांच्या डीएमकेने 131 जागांवर आघाडी घेतली असून एआयएडीएमकेला 102 जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसला केवळ 2 जागांवर आघाडी घेता आली आहे. भाजपाला अद्याप एकाही जागेवर आघाडी नाही. तर, मक्कल निधी मय्यम पक्षाला केवळ पक्षप्रमुख असलेल्या कोईम्बतूर येथील जागेवरच आघाडी घेता आली आहे.
ममतांना हरवणा-या शुभेंदू अधिकारी यांच्या कारवर हल्ला #bengal #BangalElection2021 #surajyadigital #बंगाल #सुराज्यडिजिटल #ममताबनर्जी #MamataBanerjee #हल्ला pic.twitter.com/O1lXOLWCl8
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021
कोईम्बतूरमधील सर्वात लक्ष लागलेल्या उमेदवारांच्या निकालात मक्कल निधी मय्यम पक्षाचे प्रमुख अभिनेता कमल हसन यांनी मोठी आघाडी घेतल्याचे समजते. कमल हसन यांनी काँग्रेसच्या मयुरा जयकुमार यांना मागे टाकले आहे.