मुंबई : एका लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओत नवरदेव-नवरीने काठीच्या साहाय्याने एकमेकांना वरमाला घातल्याचं दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवलं नाही तर कोरोना संसर्गाचा धोका आहे. याच गोष्टीला गांभीर्याने घेऊन नवरदेव-नवरीने काठीने एकमेकांना वरमाला घातल्या आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, कोरोनामुळे लग्नात फक्त 25 जणांचा समावेश असावा अशी प्रशासनाची अट आहे.
मोठा उल्कापींड पृथ्वीवर आदळण्याची शक्यता; नासाचा इशारा #surajyadigital #नासा #NASA #Earth #उल्कापींड #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/cy3cmV46At
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021
लॉकडाऊन काळातील एका लग्नाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. या लग्नात नवरदेव-नवरीने काठीच्या साहाय्याने एकमेकांना वरमाला घातल्या. त्यामुळे या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सोशल डिस्टन्सिंग ठेवलं नाही तर कोरोना संसर्गाचा धोका आहे. याच गोष्टीला गांभीर्याने घेऊन नवरदेव-नवरीने काठीने एकमेकांना वरमाला घातल्या. या संबंधिच्या व्हिडीओवर अनेकांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
नियम बदलला, अकरावी प्रवेशाबाबत मोठा निर्णय #surajyadigital #11th #admission #BIG #निर्णय #Rules #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/yqxmDpuqSF
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021
या संबंधिचा व्हिडीओ आयपीएस दिपांशी काब्रा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.
#कोरोना में शादियां सफलतापूर्वक संपन्न कराने के लिए इवेंट मैनेजर्स को क्या क्या जुगाड़ू समाधान निकालना पड़ता है…. 😅😅 pic.twitter.com/2WOc9ld0rU
— Dipanshu Kabra (@ipskabra) May 2, 2021
कोरोना काळात लग्नासाठी इव्हेंट मॅनेजर्सला काय काय जुगाड शोधावे लागत आहेत’, असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओत बॅकग्राउंडला मंगलाष्टिका सुरु आहेत. सुरुवातीला नवरी काठीच्या साहाय्याने नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकते. त्यानंतर नवरदेव काठीच्या साहाय्याने नवरीच्या गळ्याच वरमाला टाकण्याचा प्रयत्न करतो.
पंढरपूर पोटनिवडणुकीत विजयी, पराभूत झालेले नेते काय म्हणतायत ? https://t.co/zcUi7TgKAm
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021
यावेळी काठीतून एकदा वरमाला सरकरते. त्यावेळी एक व्यक्ती नवरदेवाच्या जवळ येऊन आपल्या हाताने काठीला वरमाला अडकवतो. त्यानंतर नवरदेव नवरीच्या गळ्यात काठीच्या साहाय्याने वरमाला टाकतो. यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात आणि जल्लोष साजरा केला जातो. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही तितकाच होतोय.
सोनिया गांधी, पवारांसह विरोधी पक्षांच्या १३ नेत्यांची मागणी; केंद्राने मोफत लसीकरण सुरु करावे, तरतूद करण्यात आलेला ३५ हजार कोटींचा निधी वापरावाhttps://t.co/nrjyC1e4R6
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021