नवी दिल्ली : सध्या तात्पुरत्या स्वरुपात आयपीएल रद्द करण्यात आली आहे. काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर यंदाचा आयपीएलचा हंगाम सध्यासाठी रद्द करण्यात आल्याची घोषणा बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केली आहे. दरम्यान आतापर्यंत आयपीएलशी संबंधित 3 खेळाडूंसह 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
पहिल्यांदाच पंतप्रधानांनी शुभेच्छा देण्यासाठी फोन केला नाही – ममता बॅनर्जी https://t.co/diDihHOwsL
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यंदाचा आयपीएलचा हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
UPDATE: The Indian Premier League Governing Council (IPL GC) and Board of Control for Cricket in India (BCCI) in an emergency meeting has unanimously decided to postpone IPL 2021 season with immediate effect.
Details – https://t.co/OgYXPj9FQy pic.twitter.com/lYmjBId8gL
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याआधी अशी शक्यता वर्तवली जात होती की सर्व सामने मुंबईत हलवण्यात येणार आहेत. मात्र आता राजीव शुक्ला यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार यंदाचा सीझनच रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत महत्त्वाचा निर्णय क्रिकेट विश्वातून घेतला जात आहे.
The Indian Premier League Governing Council (IPL GC) and Board of Control for Cricket in India (BCCI) in an emergency meeting has unanimously decided to postpone IPL 2021 season, with immediate effect: BCCI pic.twitter.com/3NaN3qgJdt
— ANI (@ANI) May 4, 2021
महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून आयपीएलला सुद्धा याचा फटका बसला आहे. एकापाठोपाठ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्यामुळे आयपीएल सीझन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याबद्दल राजीव शुक्ला यांनी घोषणा केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आयपीएलमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे सोमवारी रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्ध कोलकाताचा सामना रद्द करण्यात आला आहे. आजच्या सामन्यावर सुद्धा कोरोनाचे संकट ओढावले होते. पण योग्य ती खबरदारी घेत, सामने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
In continuation to my humble attempt to help citizens fight our battle against COVID, I will be funding the purchase of a Haemonetics Apheresis Machine to Divine Charitable Blood Bank, Delhi for their New Plasma Bank at (1/2)
— Shikhar Dhawan (@SDhawan25) May 3, 2021