सोलापूर : मोहोळचे माजी आमदार तथा माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या सुविद्य पत्नी अनुराधा लक्ष्मण ढोबळे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथील एका रुग्णालयात आज (४ मे )पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५८ वर्षाच्या होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘सावली’ वुमेन्स फाउंडेशन च्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या पश्चात पती माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, मुलगा अभिजीत ढोबळे, सून शारोन अभिजीत ढोबळे, दोन मुली क्रांती आवळे व कोमल साळुंखे तसेच जावई अब्राहम आवळे, अजय साळुंखे व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
१०० दिवसांची कोविड ड्युटी करणाऱ्यास सरकारी नोकरीत प्राधान्य https://t.co/P1S6L7c93b
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
त्या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या जाण्याने शाहू परिवार व महात्मा फुले सूत गिरणी परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पंढरपूर पोटनिवडणुकीत विजयी, पराभूत झालेले नेते काय म्हणतायत ? https://t.co/zcUi7TgKAm
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021