कोल्हापूर : कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापुरात उद्या बुधवारपासून (5 मे) पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार 15 मे पर्यंत कोल्हापुरात लॉकडाऊन असणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांचे निधन
https://t.co/yKlLb5ScnV— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोल्हापूरसह आजपर्यंत ठाणे, पनवेल, नवी मुंबई, पुणे-पिंपरी-चिंचवड, रायगड, सोलापूर, बारामतीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
बिग ब्रेकिंग : अखेर आयपीएल रद्द https://t.co/whKNRVVq8W
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्रातील ठाणे, पुणे-पिंपरी, पनवेल, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
– काय वाटतं ?
पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचा विजयाचा आमदार पडळकर देवेंद्र फडणवीसांना पेढा भरवताना…#surajyadigital #politics #pandharpur #ByElection #DevendraFadnavis #Gopichand #MLA #भाजपा #विजय pic.twitter.com/U6KRDr6yWh— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोल्हापुरात येत्या सोमवारपासून म्हणजेच 20 जुलैपासून सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. यादरम्यान, सर्व नागरिकांनी या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. लॉकडाऊन दरम्यान कोल्हापुरात फक्त औषध आणि दूध पुरवठाच सुरु राहील, इतर सर्व सेवा शंभर टक्के बंद राहणार आहेत.
आयपीएल सुरू ठेवण्याचा आग्रह का ? जाणून घ्या, आर्थिक गणित, शेवटी केली रद्दhttps://t.co/sBZb2f0IVm
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात येत्या सोमवारपासून सात दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला.
१०० दिवसांची कोविड ड्युटी करणाऱ्यास सरकारी नोकरीत प्राधान्य https://t.co/P1S6L7c93b
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
“कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आढळत असल्याने थोडीशी चिंता वाढली आहे. या संकटावर लवकरात लवकर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. परंतु, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घेणे गरजेचे आहे. सोशल डिस्टसिंगचे नियम योग्य पद्धतीने आणि काटेकोरपणे पाळणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वजण प्रयत्न करुया, कोरोना संकटाचा मुकाबला करुया”, असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना केलं आहे.
हैदराबाद – प्राणी संग्रहालयातील आठ सिंहांना कोरोनाची लागण #सिंह #surajyadigital #Leo #सुराज्यडिजिटल #coronavirus #हैदराबाद #haidrabad pic.twitter.com/k5VDpvKICw
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021