मुंबई : वादळी वाऱ्यासह जोरदार पूर्व मोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पूर्व मोसमी पावसाचा इशारा दिला आहे. प्रादेशिक हवामान विभाग मुंबईनं मेघगर्जनेसह आणि विजांचा कडकडाट, वेगवान वाऱ्याची आणि पावसाची शक्यता वर्तवली आहे. या अंदाजानुसार सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पाऊस हजेरी लावू शकतो. उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि गोवा – या भागामध्ये आजपासून ९ मेपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात आज 62 हजार 194 नवे कोरोना रुग्ण तर 853 जणांच्या मृत्यूची नोंद #surajyadigital #maharashtra #coronavirus #महाराष्ट्र #कोरोना #मृत्यू #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/lfyuimmngF
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे ऐन कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुंबई, ठाण्यासारख्या शहरांमध्ये उन्हाचा तडाखा आणखी वाढला आहे. अशात आता आणखी आठवडाभर राज्यावर अवकाळी पावसाचं संकट राहणार आहे. पुढच्या ४-५ दिवसांत उष्णतादेखील वाढेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
अभिनेत्री श्री प्रदा यांचे कोरोनाने निधन https://t.co/nLE6ZyHUpu
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि केरळदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं वातावरण तयार होत आहे. यात उष्णताही वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे आजपासून अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींना सुरुवात झाली आहे.
latest observation from satellite at 9.55 hrs
bit of cloudiness over south madhya Mah and Goa.
Off coast of Kerala too. pic.twitter.com/jSWPRhEiRu— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 6, 2021
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, विजांचा कडकडाट आणि गाराही पडण्य़ाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, ९ मेपर्यंत राज्यभर असंच वातावरण असणार आहे. सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
शरद पवार, उध्दव ठाकरेंचे फोटो मॉर्फ करुन बदनामी, 13 जणांवर गुन्हा दाखल https://t.co/sStgE4ho6G
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021