सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 8 मे रोजी रात्री 8 वाजल्यापासून 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान मेडिकलसह अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.
आठवडाभर राज्यावर अवकाळी पावसाचं संकट , कोण-कोणत्या जिल्ह्यात पहा https://t.co/308UAmtamT
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नव्याने निर्बंध लागू केल्याची माहिती दिली. जिल्ह्यात कडक संचारबंदी राहील. मेडिकल वगळता किराणा दुकाने, भाजीपाला, दूध विक्रीही पूर्णता बंद राहील. पासधारक दूध विक्रेत्यांना दूध घरपोच देता येईल. मार्केट यार्डही बंद राहील, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज गुरूवारी रात्री दिले आहेत.
आठवड्याच्या लॉकडाऊनमध्येच बुधवारी (ता.12) रमजान ईद तर शुक्रवारी (ता. 14) अक्षय्यतृतीया आहे. हे दोन्ही सणाला होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने हा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. भाजीपाला बंद असल्याने अक्षयतृतीयाला आंबा मिळणार नाही.
महाराष्ट्रात आज 62 हजार 194 नवे कोरोना रुग्ण तर 853 जणांच्या मृत्यूची नोंद #surajyadigital #maharashtra #coronavirus #महाराष्ट्र #कोरोना #मृत्यू #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/lfyuimmngF
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सदर आदेश सोलापूर शहर व ग्रामीण परिसरात लागू राहील. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात नव्याने कडक निर्बंध लागू केले आहेत. महापालिका आयुक्त तसेच जिल्हा परिषद सीईओ यांच्या उपस्थितीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
शरद पवार, उध्दव ठाकरेंचे फोटो मॉर्फ करुन बदनामी, 13 जणांवर गुन्हा दाखल https://t.co/sStgE4ho6G
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
सोलापूरची रुग्णसंख्या वाढत असल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येत्या आठ तारखेला रात्री आठ वाजल्यापासून पंधरा तारखेला सकाळी सात वाजेपर्यंत मेडिकल अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व सेवा बंद राहणार आहेत.
कोरोनाची साखळी मोडण्यासाठी लॉकडाऊन हा एकच पर्याय आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आणायची असेल तर प्रशासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागतो. गरज नसताना देखील लोकं बाहेर पडतात. ज्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
मॅरेथॉन जिंकणाऱ्या लताच्या पतीचा कोरोनाने घेतला बळी https://t.co/gkjzZcoXhh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021