मुंबई : राज्यात आता 11 वीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचा विचार केला जात आहे. कोरोनामुळे 10 वीच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे आता पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना कसा प्रवेश घेता येईल, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षण मंडळ 11 वीत प्रवेश करण्यासाठी सामायिक परीक्षा घेण्याबाबत चाचपणी करत आहे. शिक्षण विभाग मुल्यमापन करणार आहे. यात दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मतं सुद्धा नोंदवता येणार आहे.
सोलापूर – पुणे महामार्गावरील भुयारी मार्गासाठी २० कोटी ६३ लाख मंजूर, अपघाताचे प्रमाण होणार कमी https://t.co/k7cW1u4dP3
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021
दहावीच्या शाळा यंदा ऑनलाईन पद्धतीने झाल्या त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाला घ्यावा लागला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पंढरपूर निवडणुकीत केलेल्या "मायीचा लाल" वाक्यावर भाजप नेते आमदार गोपिचंद पडळकरांचे विधान #surajyadigital #Gopichand #गोपिचंदपडळकर #भाजपा #अजितपवार #pandharpur #पंढरपूर #ByElectionhttps://t.co/i4BxsVlEKE
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021
राज्यात कोरोनाच्या परिस्थितीमुळे शिक्षण व्यवस्था पुरती कोलमडून गेली आहे. पहिली ते 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे. दहावीची परीक्षासुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. आता 11 वीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचा विचार केला जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दहावीच्या परीक्षा कोरोनाच्या परिस्थितीमुळे घेता आल्या नाही. त्यामुळे आता पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना कसा प्रवेश घेता येईल, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. शिक्षण मंडळाकडून अकरावीत प्रवेश करण्यासाठी सामायिक परीक्षा घेण्याबाबत चाचपणी करत आहे.
कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी अडीच हजार नातेवाईकांकडून वसूल करणार #surajyadigital #सुराज्यडिजिटल #coronavirus #patient #अंत्यसंस्कार #वसूल #वर्धा pic.twitter.com/724b9TWNIO
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021
त्यामुळे शिक्षण विभागाकडून आता दहावीच्या विद्यार्थ्यांचं अंतर्गत मुल्यमापन केले जाणार आहे. यासाठी शिक्षण विभाग एक सर्वेक्षण करणार असल्याची माहिती मिळत आहे. शिक्षण विभाग सर्व शाळांना लिंक शेअर करून माहिती गोळा करणार आहे. यात दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मतं सुद्धा नोंदवता येणार आहे. या सर्वेक्षणानंतर एक अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर सामायिक परीक्षा घेण्याबद्दल निर्णय घेतला जाईल.
आज स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी – विनम्र अभिवादन #swami #akkalkot #राजाधिराज #अक्कलकोट #स्वामीसमर्थ #पुण्यतिथी #अभिवादन #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/elrsGQhq7k
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021
मागील महिन्यात दहावीची परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात यावे यासंदर्भात मंत्रिमंडळात एकमताने निर्णय घेण्यात आला होता. दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांचं इंटरनल असेसमेंट होणार असून त्या संदर्भात शिक्षण क्षेत्रातील तज्ञांसोबत चर्चा करुन सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.
जगाने सुटकेचा निःश्वास सोडला, चीनचे भरकटलेले रॉकेट समुद्रात कोसळले
https://t.co/x4GNR9h28V— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021