सोलापूर / मोहोळ : सोलापूर पुणे महामार्गावरील मोहोळ शहरातील कन्या प्रशाला चौक येथे भुयारी मार्गासाठी २० कोटी ६३ लाख रुपये मंजूर करण्यात आले. याबाबतची अधिकृत माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे जाहीर केली.
Ministry of Road Transport and Highways has recently approved one-time improvement of 10.8 km NH stretch passing through Miraj city. It will ease traffic congestion in Miraj City. #PragatiKaHighway@PatilSanjaykaka @OfficeofUT
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) May 8, 2021
या भुयारी मार्गामुळे अपघाताचे प्रमाण कमी होणार असून गेल्या १० वर्षांपासून ची मागणी पूर्ण होत असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर सोलापूर आणि पुणे या दोन शहरांचे अंतर कमी झाले आहे. मात्र मोहोळ शहरातील कन्या प्रशाला चौकात भुयारी मार्ग नसल्यामुळे रस्ता ओलांडताना विविध रस्ते अपघातात आतापर्यंत शेकडो जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे मोहोळ शहर व तालुकावासीयांनी या चौकात भुयारी मार्ग व्हावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे केली होती.
गेल्या अनेक वर्षापासून अनेकांचे अपघात होऊन मृत्युमुखी पडण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या मोहोळ शहरातील कन्या प्रशाला चौकात तब्बल 20 कोटी 63 लाख रुपयांच्या उड्डाणपुलासाठी मंजुरी दिल्या बद्दल केंद्रीय दळणवळण मंत्री @nitin_gadkari साहेब आपले मनापासून आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻 https://t.co/qc6KudnJXm
— Yashwant Mane (@YashwantManeNCP) May 8, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महामार्ग प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत असल्यामुळे विविध पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी आंदोलने उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या भुयारी मार्गासाठी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा केला होता. या सर्व आंदोलने, उपोषणाची तसेच वस्तुस्थितीची दखल घेत गडकरी यांनी या भुयारी मार्गासाठी निधी मंजूर केला आहे.
आज स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी – विनम्र अभिवादन #swami #akkalkot #राजाधिराज #अक्कलकोट #स्वामीसमर्थ #पुण्यतिथी #अभिवादन #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/elrsGQhq7k
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021
* यांनी केला होती मागणी
हा भुयारी मार्ग व्हावा म्हणून प्रथमतः कन्या प्रशाला व नेताजी प्रशालेचे शिक्षकांनी, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष दशरथ काळे, भीम युवा प्रतिष्ठानचे ॲड विनोद कांबळे, लोकसेवक संजय क्षीरसागर, कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष गायकवाड, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे विक्रम देशमुख, ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने रमेश बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल क्षीरसागर, शिलवंत क्षीरसागर यांनी आंदोलने उपोषणे करून या मागणीचा पाठपुरावा केला होता तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पद्माकर कोळेकर व मनोज गुरव, मोहोळ तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष सतीश काळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सदर मागणीचे निवेदन दिले होते. तसेच मोहोळ तालुका पत्रकार संघातील सदस्यांनी ही मागणी लावून धरली होती.
जगाने सुटकेचा निःश्वास सोडला, चीनचे भरकटलेले रॉकेट समुद्रात कोसळले
https://t.co/x4GNR9h28V— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021