नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय असलेले चीनचे 21 टन वजनी भरकटलेले रॉकेट अखेर समुद्रात कोसळले आहे, त्यामुळे जगाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. काहीवेळापूर्वीच या रॉकेटचे अवशेष अरबी महासागरात कोसळल्याचे वृत्त ‘एएफपी’ न्यूजने दिले आहे.
मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेल्या चीनच्या अनियंत्रित रॉकेटने पृथ्वीवर लँडींग केली आहे. चीनचे रॉकेट अरबी समुद्रात कोसळल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या रॉकेटचे अवशेष अरबी समुद्रात आढळले आहेत.
महाराष्ट्र – दोन दिवस विदर्भासह राज्यात दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज #surajyadigital #rain #maharashtra #जोरदार #सुराज्यडिजिटल #पाऊस #2day pic.twitter.com/QLYIIGtw7A
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021
चीनने लॉन्ग मार्च 5बी रॉकेट 29 एप्रिलला चीनच्या हाइनान द्वीपवरुन लॉन्च केले होते. हे रॉकेट अंतराळात स्पेस स्टेशन बांधण्यासाठी साहित्य घेऊन जात होते. पण, काही बिघाड झाल्यामुळे रॉकेट पृथ्वीच्या दिशेने अनियंत्रित होऊ निघाले. हे रॉकेट पृथ्वीच्या पृष्ठ भागावर कोसळल्यास मोठे नुकसान होईल, अशी शक्यता चिनी माध्यमांनी वर्तवली होती. पण, पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर हे रॉकेट नष्ट करण्यात आले. त्यानंतर रॉकेटचे तुकडे समुद्रात जाऊन कोसळले.
चीनचे भरकटलेले २१ टन वजनाचे रॉकेट उद्या पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता https://t.co/3gyUm2lwSy
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या रॉकेटने पृथ्वीच्या दिशेने उलटा आणि अनियंत्रित प्रवास सुरु केला होता. हे रॉकेट पृथ्वीवर कोसळल्यास मोठे नुकसान होईल, अशी शक्यता चिनी माध्यमांनी वर्तविली होती. मात्र, पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर हे रॉकेट नष्ट करण्यात आले. त्यानंतर रॉकेटचे तुकडे समुद्रात जाऊन कोसळले, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.
अंतराळात रॉकेटचा मुख्य भाग फिरत होता. हाच भाग पृथ्वीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. रॉकेटचा हा भाग जवळपास 100 फूट लांब होते. याचे वजन तब्बल 21 टन होते. मात्र, पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताना या रॉकेटचे तुकडे झाल्याची शक्यता आहे.
जुनी आयडीबीआय बँक सरकार विक्री करण्याच्या तयारीत, खासगीकरणाच्या निर्णयाला विरोध https://t.co/FZtkEbA7yI
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021
पृथ्वीवर पडणाऱ्या या रॉकेटचे नाव लॉन्ग मार्च 5-बी वाय-2 असे होते. सध्या हे रॉकेट पृथ्वीच्या बाजूने लो-अर्थ ऑरबिटमध्ये फिरत होते. म्हणजेच हे रॉकेट सध्या पृथ्वीपासून 170 ते 372 किलोमीटर उंचीवर आहे. हे रॉकेट पृथ्वीभोवती तब्बल 25,490 किलोमीटर प्रतितास म्हणजेच एका सेकंदाला 7.20 किलोमीटर एवढ्या गतीने फिरत होते.
पतीला प्रमोशन देणार नाही; धमकी देत विवाहितेवर बलात्कार, पुण्यातील घटना https://t.co/VmUVYiyZaj
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021