हैदराबाद : भारत बायोटेक फर्ममधील 50 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. भारत बायोटेकच्या सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांनी काही राज्य आमच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आमचे 50 कर्मचारी कोव्हिड संक्रमणामुळे काम करत नाही आहेत. तरी देखील आम्ही पँडेमिकमध्ये 24×7 काम करत आहोत, असं ट्वीट केले आहे. या ट्वीटनंतर व्हॅक्सिन बनवणाऱ्याच कंपनीत एवढे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह कसे असा केला जात आहे.
पुणे – मुंबई धावणारी डेक्कन क्वीन उद्यापासून रद्द #pune #पुणे #mumbai #मुंबई #रद्द #सुराज्यडिजिटल #cancelled #surajyadigital #decanqueen pic.twitter.com/t8t4rrRv8f
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
भारत बायोटेकच्या सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांनी ट्वीट केले आहे की त्यांचे 50 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. सुचित्रा इला यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर मोठी खळबळ माजली आहे. जी कंपनी कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी व्हॅक्सिन बनवते त्याच कंपनीत एवढे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
भाजप खासदार, आमदारांचे सोलापुरात लाक्षणिक उपोषण https://t.co/6IerCqBKVW
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
भारत बायोटेकमध्ये झालेल्या कोरोनाच्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर असा सवाल विचारला जातो आहे की, कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना लस का दिली नाही.
Covaxin dispatched 10/5/21.18 states have been covered thou in smaller shipments. Quite disheartening to the teams to hear Some states complaining about our intentions. 50 of our employees are off work due to covid, yet we continue to work under pandemic lockdowns 24×7 for U 🇮🇳 pic.twitter.com/FmQl4vtqXC
— Suchitra Ella (@SuchitraElla) May 11, 2021
कोवॅक्सिनच्या पुरवठ्यात अडसर आल्यानंतर काही नेत्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना इला यांनी काल बुधवारी ट्वीट केलं होतं. यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘टीमसाठी हे ऐकणं फार वाईट आहे की काही राज्य आमच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आमचे 50 कर्मचारी कोव्हिड संक्रमणामुळे काम करत नाही आहेत. तरी देखील आम्ही पँडेमिकमध्ये लॉकडाऊनमध्ये 24×7 तुमच्यासाठी काम करत आहोत.
जीवघेण्या काळात नौटंकी नको, कृतिशील सहभाग नोंदवा, खासदार स्वामींचे त्याच पुनम गेटवर जाहीर सत्कार करेनhttps://t.co/rSNzJhtOp7
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
इला यांनी ट्वीट केल्यानंतर त्यावर लोकांकडून अशा प्रतिक्रिया येत आहेत की या कर्मचाऱ्यांना कोरोना व्हॅक्सिन दिलं नव्हतं का? ते कोरोना पॉझिटिव्ह कसे आढळून आले? शिवाय अस्थायी स्वरुपात काही नवीन कर्मचाऱ्यांना भरती करून का घेतलं नाही? दरम्यान इला यांच्या ट्वीटवर काहींनी त्यांचे आभारही मानले आहे. म्हणजे या ट्वीटरनंतर ट्विटरवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
वेळापुरात पोलीस कर्मचारी वकीलास लाचलुचपत खात्याने ठोकल्या बेड्या https://t.co/lHe0ZbmIlY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021