नवी दिल्ली : गुगल पे ने आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे. आता अमेरिकेत बसून एखादा व्यक्ती भारतात सहजपणे पैसे ट्रान्सफर करू शकणार आहे. पैशांची ही ट्रान्सफर वाईज आणि वेस्टर्न यूनियन कंपन्यांमार्फत केली जाईल. येत्या काही महिन्यांत ही सेवा वाईज कंपनीमार्फत 80 देशांत आणि वेस्टर्न युनियनमार्फत 200 देशांमध्ये दिली जाईल. या वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय मनी ट्रान्सफरची सुविधा सुरू होईल, असं गुगल पे चे म्हणणे आहे.
महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार, मंत्रिमंडळ बैठकीत एकमत https://t.co/HYMJ3CBhWX
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
मनी ट्रान्सफर अॅप गुगल पेने आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. आता अमेरिकेत बसलेला एखादा माणूस आपल्या कुटुंबाला किंवा मित्रांना भारतात सहजपणे पैसे ट्रान्सफर करू शकणार आहे. भारताबरोबरच ही सुविधा सिंगापूरमधील लोकांनाही मिळणार आहे. पैशांची ही ट्रान्सफर वाईज आणि वेस्टर्न युनियन कंपन्यांमार्फत केली जाईल. गुगल पे चे म्हणणे आहे की, येत्या काही महिन्यांत ही सेवा वाईज कंपनीमार्फत 80 देशांत आणि वेस्टर्न युनियनमार्फत 200 देशांमध्ये दिली जाईल.
पश्चिम बंगालमध्ये नुकतेच विजयी झालेले भाजपाचे दोन आमदार देणार राजीनामा, फेरनिवडणूक घ्यावी लागू शकते
https://t.co/n8zUhT6PRJ— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
या देशांमध्ये या वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय मनी ट्रान्सफरची सुविधा सुरू होईल. आपण पैशांच्या हस्तांतरणासाठी संपूर्ण जागतिक बाजाराकडे नजर टाकल्यास यामध्ये गूगलचा वाटा 470 अब्ज डॉलर्स आहे. परदेशातून पैसे हस्तांतरीत करण्यात वेस्टर्न युनियन ही सर्वोच्च कंपनी आहे आणि या कामात तिचे प्रथम स्थान आहे. हे कार्य डिजिटल करण्यासाठी आता गुगलने वेस्टर्न युनियन आणि वाईज सोबत भागीदारी केली आहे. ही भागीदारी आंतरराष्ट्रीय स्तरावर पैशांचे हस्तांतरण सोपे आणि सुलभ करणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रॉयटर्सच्या अहवालानुसार जगभरात गूगल पे चे 40 देशांमध्ये 150 दशलक्ष वापरकर्ते आहेत. कोरोना साथीच्या काळात ऑनलाईन पैशांच्या हस्तांतरणामध्ये वाढ झाली असून याचा फायदा गुगल पे सारख्या कंपन्या घेत आहेत. तथापि, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षातील आकडेवारी पाहिल्यास, उत्पन्न कमी झाले आहे आणि पैसे पाठविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जगातील सर्व स्थलांतरीत लोक आपल्या घरी पाठवत असलेल्या पैशांमध्ये 14% घट दिसून येत आहे. आर्थिक परिस्थितीतील गडबड झाल्यामुळे हे घडले आहे कारण रोजगारात घट झाली आहे, नोकऱ्याही गेल्या आहेत.
सलमानचा राधे चित्रपट आज होणार प्रदर्शित #Radhe #surajyadigital #सुराज्यडिजिटल #salmankhan #films pic.twitter.com/uimSe0tnil
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेतील लोक भारतात पैसे पाठवू शकतील, असे गुगल प्लेने म्हटले आहे. असे लोक वेस्टर्न युनियनच्या नेटवर्कचा आधार घेऊ शकतात. या बँकेची 125 देशांमध्ये कोट्यावधी खाती आणि लाखो वॉलेट आहेत. गूगल पे अॅपवर फक्त एका क्लिकवर काही वेळात पैसे हस्तांतरीत करु शकणार आहे. वेस्टर्न युनियनकडे जगातील 200 देशांमध्ये सुमारे 5 लाख रिटेल लोकेशन आहेत, जिथून पैसे हस्तांतरणाचे काम होते. वेस्टर्न यूनियन क्रॉस कंट्री आणि क्रॉस चलन पेमेंट ट्रान्सफर प्लॅटफॉर्म आहे. गुगल पेद्वारे लोक सुरक्षित आणि लवकर पैसे हस्तांतरीत करु शकतील.
उद्या शुक्रवारी साजरी होणार रमजान ईद, चंद्रदर्शन घडलं नसल्यानं धर्मगुरूंचा निर्णय https://t.co/XutgmTqOtA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021