सोलापूर : केंद्र शासन व राज्य शासनामार्फत रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन पुरवठा व कोव्हिड लसींचा पुरवठा पुणे विभागातील जिल्ह्यांना केला जात आहे. पण सोलापूर जिल्ह्याला सापत्न वागणूक देऊन रुग्णांच्या संख्येनुसार इंजेक्शन, ऑक्सिजन, लशींचा पुरवठा होत नाही, याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे खासदार व आमदारांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
१८ ते ४४ वयोगटाचे कोरोना लसीकरण थांबवले https://t.co/ixf7eewhYa
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
“या सरकारचं करायचं काय, खाली मुंडी वरती पाय…’ यासह राज्य सरकारविरोधी जोरात घोषणाबाजी देण्यात आल्या. खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार राजेंद्र राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, आमदार राम सातपुते आदींनी उपोषणात सहभाग घेतला. दुपारी सर्व आमदार व खासदारांनी पायी चालत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उद्या शुक्रवारी साजरी होणार रमजान ईद, चंद्रदर्शन घडलं नसल्यानं धर्मगुरूंचा निर्णय https://t.co/XutgmTqOtA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
* मामांचा उपरोधिक टोला
सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अशा जीवघेण्या काळात नौटंकी करू नका. कृतिशील सहभाग नोंदवा. कृतिशील सहभाग नोंदवून लोकांच्या मदतीला धावून आलात. तर त्याच पूनम गेटवर तुमचा जाहीर सत्कार करेन. असा उपरोधिक टोला पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भाजप आमदार, खासदारांना लगावला आहे.
* सोलापूर जिल्ह्याचा कोटा इतर जिल्ह्यांना दिला जातोय
पुणे विभागासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन व कोव्हिड लस पुरवठा करताना पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्यावर वितरणाबाबत अन्याय होत आहे. सोलापूर जिल्ह्याला रुग्णांच्या प्रमाणात रेमडेसिव्हिर इंजेक्शन दिली जात नाहीत. ऑक्सिजनचा पुरवठा अद्यापही सुरळीत केला जात नाही. कोव्हिड लसही लोकसंख्येच्या प्रमाणात दिली जात नाही.
टेस्ट किटचा पुरवठा जिल्ह्याला कमी प्रमाणात केला जातो. याउलट पुणे विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याचे मंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यास जास्त प्रमाणात झुकते माप देऊन सोलापूर जिल्ह्याचाही कोटा इतर जिल्ह्यांना दिला जात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कोव्हिड रुग्णसंख्या वाढत असून त्याचा परिणाम जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूदरामध्ये झालेला आहे.
गुगल पेची ग्राहकांसाठी खुशखबर ! अमेरिकेतून भारतात पैसे पाठवा https://t.co/SymVWBASZy
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021