मुंबई : इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईदवर (ईद-उल-फित्र) येत्या शुक्रवारी (१४ मे) सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे, अशी घोषणा शहर-ए-खतीब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या धर्मगुरूंच्या विभागीय बैठकीत बुधवारी संध्याकाळी करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद निमित्त गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यात ‘ब्रेक द चेन’ या मोहीमेअंतर्गत कडक निर्बंध लागू आहेत.
उद्या शुक्रवारी साजरी होणार रमजान ईद, चंद्रदर्शन घडलं नसल्यानं धर्मगुरूंचा निर्णय #eidmubarak #Eid #Ramdan #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/2m4YI51gSW
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
काल बुधवारी चंद्रदर्शन होईल असे वाटत असताना ते न झाल्याने आता मुस्लिम बांधवांची रमजान ईद शुक्रवारी साजरी होणार आहे. त्यामुळे आज, गुरुवारी या महिन्याचा तिसावा उपवास होणार असून त्यानंतर शुक्रवारी (१४ मे) रमजान ईद साजरी होणार आहे. रमजान महिन्याचे चंद्रदर्शन बुधवारी होण्याची शक्यता गृहीत धरून हिलाल सीरत कमिटीने चंद्रदर्शन पाहण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शहरातील विविध ठिकाणी चंद्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रमजान महिन्याचे चंद्रदर्शन बुधवारी सायंकाळनंतर कोठेही होऊ शकले नाही.
१८ ते ४४ वयोगटाचे कोरोना लसीकरण थांबवले https://t.co/ixf7eewhYa
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
पश्चिम बंगालमध्ये नुकतेच विजयी झालेले भाजपाचे दोन आमदार देणार राजीनामा, फेरनिवडणूक घ्यावी लागू शकते
https://t.co/n8zUhT6PRJ— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
यासंदर्भात हिलाल सीरत कमिटीच्या सदस्यांच्या झालेल्या बैठकीत बुधवारी रात्री गुरुवारी रमजान महिन्याचा शेवटचा उपवास (तिसावा) करण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (१४मे ) रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे, असा निर्णय हिलाल कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, रमजान ईद साजरी करण्याबाबत राज्य शासनाने नियमावली जारी केली आहे. त्याद्वारे मुस्लिम बांधवांनी ईद साजरी करण्यासाठी एकत्र न येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. करोना विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये, तर सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोना- जवळपास 100 मृतदेह नदीत वाहून आले, युपी-बिहार हादरले, मृतदेहांनी गंगा झाली मैलीhttps://t.co/i1CzqqGVTY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
* वेळेचे तंतोतंत पालन करा
नमाज पढण्यासाठी मशिदीत किंवा मोकळ्या जागेत देखील एकत्र येऊ नये, अशीही सूचना शासनातर्फे देण्यात आली आहे. रमजान ईदेच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले आहे. या वेळेचे तंतोतंत पालन करण्यात यावे आणि त्या वेळेव्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये, अशीही सूचना करण्यात आली आहे.