मुंबई / नवी दिल्ली : देशात सध्या कोव्हिशिल्ड ही कोरोनावरील लस दिली जात आहे. त्यात आता सरकारने मोठा बदल केला आहे. कोव्हिशिल्डचा एक डोस दिल्यानंतर दुसरा डोस 12 ते 16 आठवड्यांनी द्यावा, असे सरकारने स्पष्ट केले आहे. या निर्णयाचे सिरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी स्वागत केले आहे. हा एक वैज्ञानिक निर्णय आहे, लसीचा प्रभाव, रोगप्रतिकारशक्ती या दोन्हींसाठी हा निर्णय फायदेशीर आहे, असे पुनावाला यांनी म्हटले आहे.
प्रधानमंत्री @narendramodi ने आज #PMKisan की आठवीं किस्त जारी की। 9.5 करोड़ से ज्यादा किसानों के खाते में 19000 करोड़ से अधिक की राशि ट्रांसफर की गई है। देखिए इस योजना से मिली मदद से किसान परिवारों को कैसे हो रहा है फायदा। @AgriGoI @nstomar @PIBHindi @PMOIndia @MIB_Hindi pic.twitter.com/7DMUB8rohs
— MyGov Hindi (@MyGovHindi) May 14, 2021
सीरम इंस्टिट्यूटमध्ये दर मिनिटाला कोव्हिशिल्ड लसीच्या 5 हजार कुप्या तयार होतात. प्रत्येक कुपीमध्ये १० डोस असतात. एक कुपी उघडल्यानंतर तिचा पुढील 4 ते 5 तासांत वापर होणे गरजेचे आहे. कोव्हिशिल्ड लस ही 70 टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरत आहे. म्हणून देशात कोव्हिशिल्ड लसीसाठी जास्त मागणी आहे. कोव्हिशिल्ड लस 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात साठवून ठेवली जाते. सध्या सीरम इंस्टिट्यूटमध्ये २ हजार कोटी लसीच्या कुप्या साठवून ठेवण्याची क्षमता आहे.
विठू-रखुमाईला हापूस आंब्यांची आरास, दगडूशेठ गणपतीला 1,111 हापूस आंब्यांची आरास https://t.co/2QlL3U0lns
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिशील्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी 12 ते 16 आठवड्यांचे अंतर ठेवण्याचा कोविड वर्किंग ग्रुपचा सल्ला मान्य केला आहे. अशा परिस्थितीत ज्यांनी कोव्हिशिल्ड लसचा पहिला डोस घेतला आहे, आता ते लोक 12 ते 16 आठवड्यांच्या अंतराने या लसीचा दुसरा डोस घेऊ शकतील. मात्र, हे स्पष्ट केले की दोन कोव्हॅक्सिन डोस दरम्यानच्या वेळेच्या अंतरात कोणताही बदल होणार नाही. केंद्र सरकारने लसीकरणासाठी गठित केल्या नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुपने (NTAGI) ने कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस केली होती.
शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा, लगेच चेक करा, 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 19 हजार कोटी वर्गhttps://t.co/kVPp7MzCOc
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
डॉ. एन. के. अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील कोविड कार्यकारी गटाने, कोव्हीशील्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. कोव्हीशिलड लसीच्या दोन मात्रांमधील विद्यमान अंतर 6-8 आठवडे आहे. विशेषतः ब्रिटनमधील उपलब्ध वास्तववादी पुराव्यांच्या आधारे, कोविड -19 कार्यकारी गटाने कोव्हीशिल्ड लसीच्या दोन मात्रांमधील अंतर 12-16 आठवड्यांपर्यंत वाढवण्यासाठी सहमती दर्शविली.
आज ईद, अक्षय तृतीया, परशुराम आणि बसवेश्वर जयंती, पंतप्रधान मोदी यांनी दिल्या शुभेच्छा…#pm #surajyadigital #Eid #सुराज्यडिजिटल #शुभेच्छा #parshuramjayanti2021 #basavjayanti #Jayanti pic.twitter.com/j1cOM7FDCc
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
लसीकरणाबाबत सरकारी समितीने अनेक शिफारसी केल्या होत्या. कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यासोबतच, ज्यांना लॅब टेस्टमध्ये कोविड असल्याची पुष्टी झाली आहे, त्यांना रिकव्हरीच्या सहा महिन्यांपर्यंत लस देऊ नये असेही सांगितले होते. सध्या, तज्ञ रिकव्हरीच्या एका महिन्यानंतर लसीकरण करण्याची शिफारस करतात.
#LargestVaccineDrive pic.twitter.com/9iNvdWsaDo
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) May 14, 2021
मार्चमध्ये, केंद्र सरकारने कोव्हिशिल्डच्या दोन डोस दरम्यान 4-8 आठवड्यांचा कालावधी असावा असे सांगितले होते. यापूर्वी ही मुदत 4-6 आठवडे होती. लॅन्सेटमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये 12 आठवड्यांचे अंतर असल्यास त्याचा प्रभाव वाढतो. युनायटेड किंगडम आणि कॅनडामध्ये लसचा दुसरा डोस चार महिन्यांनंतर दिला जात आहे.
आज अक्षय तृतीया : या गोष्टी दान केल्या जातात, जाणून घ्या अधिक माहिती https://t.co/PQVhZDq1AB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
कोविड कार्यकारी गटाची शिफारस, नीति आयोग (आरोग्य) चे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 लसीसंदर्भातील राष्ट्रीय तज्ञ गट (एनईजीव्हीएसी) ने 12 मे 2021 रोजी झालेल्या बैठकीत स्वीकारली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानेही, कोव्हीशील्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढविण्याची कोविड कार्यकारी गटाची ही शिफारस मान्य केली आहे.
आज अक्षय तृतीया : आजचा सोन्याचा भाव #surajyadigital #gold #Prise #सोने #किंमत #अक्षयतृतीया #AkshayaTritiya #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/CfSmq73Z4R
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021