हैदराबाद : तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यात एका तरुणालाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्याला क्वारंटाईन होण्याची गरज होती. मात्र क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध नसल्याने या तरुणाने घराशेजारील झाडावरच बसून १८ दिवस क्वारंटाईनमध्ये राहिल्याची माहिती पुढे आली आहे. कोठानंदीकोंडा या गावातील ही घटना आहे.
तोक्ते चक्रीवादळ – वीज गेली, नो मोबाईल नेटवर्क, नो इंटरनेट; मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टी https://t.co/TQ4FdCFP3Y
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021
संपूर्ण देशात कोरोना संसर्गाचे दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. अत्यंत वेगाने पसरणाऱ्या या संसर्गजन्य आजारामुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण गेले. अनेक कुटुंब उध्वस्त झालेत. घरातील एखाद्याला करोनाचा संसर्ग झाला तर त्याला १४ दिवस क्वारंटाईन अर्थात विलीगीकरणात राहावं लागतं. मात्र अनेकांना जागेअभावी छोट्या घरांमध्ये क्वारंटाईन राहणं अवघड ठरतं. याच समस्येमुळे तेलंगाणा राज्यातील एका तरुणाने कोरोनाची लागण झाल्यानंतर क्वारंटाईनचा कालावधी चक्क झाडावर पूर्ण केल्याचं समोर आलं आहे.
अंडी चोरणे पोलिस शिपाईला पडले महागात; झाली निलंबनाची कारवाई https://t.co/X93SqPBfRQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यातील कोठानंदीकोंडा या गावातील ही घटना आहे. येथे एका तरुणाला करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला क्वारंटाईन राहणं गरजेच होतं. मात्र घरात क्वारंटाईन होण्याची सुविधा नसल्याने या तरुणाने घराशेजारील झाडावरच ११ दिवस काढले. या तरुणाचं नाव शिवा असून तो १८ वर्षांचा आहे.
कुत्र्याला लाथ मारायला गेला अन् रिक्षावाल्याचा सुटला रिक्षावरचा ताबा https://t.co/Pg3z3mzVGk
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021
काही दिवसांपूर्वीच शिवाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. मात्र घर लहान असल्यामुळे घरात क्वारंटाईन होणं शक्य नव्हतं. शिवाय घरातील सदस्यांना करोनाची बाधा होण्याचा धोका होता. यावर मार्ग काढत शिवाने घराशेजारी असलेल्या झाडावरच बांबूच्या सहाय्याने मचाण तयार केली. यावर त्याने ११ दिवस पूर्ण केले. शिवाला घराशेजारच्या झाडावरच क्वारंटाईन होण्याची शक्कल सुचली. बांबूच्या साहाय्याने शिवाने झाडावर एक लहानशी मचाण तयार केली आणि त्यावरच बसून १८ दिवस काढले.
राजीव सातव अनंतात विलीन, मुलीने दिला आईला धीर https://t.co/Ul6ZwqIbf4
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021
आमच्या गावात विलगीकरण केंद्र नाही. माझ्या कुटुंबात चार जण राहतात. त्यांना कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला. गावातील काही जणांना सरपंचांना याबाबत सांगितलं. मात्र ते मदतीसाठी पुढे आले नाहीत. गावातून अन्य कुणीही मदतीला आलं नाही. सर्वजण कोरोनाला घाबरून घराबाहेरच पडत नाहीत. एक बादली दोरीला बांधून त्यातून अन्नपदार्थ आणि अन्य गरजेच्या गोष्टी घेतल्या, असं शिवाने सांगितलं.
कोरोना ड्युडी : सोलापूर शहरात 32 शिक्षकांना बाधा; तीन मृत्यू, मदतीचा प्रस्ताव एकाचही नाही, कोरोनाचे काम नाकारणा-या शिक्षकांना पगार नाही https://t.co/uI9g5IP9T2
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021