मुंबई : तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अंधारात गेला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भागात विजेच्या खांबावर झाडं कोसळल्यामुळे विद्युत पुरवठा ठिकठिकाणी खंडित झाला आहे. तसेच मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सुविधा खंडित झाली आहे. शिवाय रस्त्यावर झाडं कोसळली आहेत. त्यामुळे बहुतांशी रस्ते बंद आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे 447 घरांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
राजीव सातव अनंतात विलीन, मुलीने दिला आईला धीर https://t.co/Ul6ZwqIbf4
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021
भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि परिसरासाठी हवामानाची अद्ययावत माहिती दिली आहे. पुढील काही तासात मुंबईसह परिसरात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला असून, वादळी वाऱ्यांचा वेगही वाढणार आहे. मुंबईत आगामी काही तासांत ताशी 120 वेगाने वारे वाहतील, असा इशारा हवामान विभागाने दिला असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे.
हाॅटेल मरिन प्लाझा थोडक्यात बचावलं असून मरिन प्लाझाच्या कंपाऊंड वाॅलवर भलंमोठं झाड पडलं आहे. फायर ब्रिगेड आणि बीएमसीचे कर्मचारी झाड बाजुला करण्याचं काम करत आहेत. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हाॅटेलचा जनरेटवर आणि भिंतीचं नुकसान झालं आहे.
Cyclone Tauktae: Heavy Rain and gushing wind #CycloneAlert #CycloneTauktaeupdate #CycloneTaukte #Mumbai pic.twitter.com/PSfmC0XpEl
— makeupreviewblog (@makeupreviewblg) May 17, 2021
तौत्ते चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रातल्या किनारी भागाला बसला आहे. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. 200 पेक्षा जास्त झाडं पडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तसेच काही घरांचं नुकसान झालं आहे. समुद्रात उंच लाटा उसळत आहे. लोकांनी घरातच राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, नवी मुंबई या जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, खवळलेला हा समुद्र #mumbai #surajyadigital #पाऊस #rain #सुराज्यडिजिटल #मुंबई #समुद्र pic.twitter.com/XfHzAoQ7jg
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नवी मुंबई, पनवेलमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडू लागला आहे. सकाळी विश्रांती घेतलेल्या पावसाने अकरा वाजल्यानंतर बरसण्यास सुरुवात केली. यावेळी वाऱ्याचा वेग जास्त आल्याने झाडे उन्मळून पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अचानक जोरदार पाऊस येऊन जात असल्याने सकाळी अत्यावश्यक सेवेत कामाला जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना पावसात भिजावे लागले.
अंडी चोरणे पोलिस शिपाईला पडले महागात; झाली निलंबनाची कारवाई https://t.co/X93SqPBfRQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021
तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे. या दरम्यान जिल्ह्यातील आज सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. आतापर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 839 घरांचं अंशत: नुकसान झाले आहे. एका व्यक्तीचा मृत्यू आणि दोन व्यक्ती जखमी झाल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर एका प्राण्याचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील एकूण 2 हजार 263 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
A picture of the Bandra Sealink in Mumbai yesterday before the impact of CycloneTauktae Menacing yet an image like a painting💯 #cylcone #Taukte #mumbaicyclone #weather pic.twitter.com/gKZ8FMyJUe
— Sanjay S Tawalepatil (@sstawalepatil) May 17, 2021
तोक्ते चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यातील डोंगर माथ्यावर असलेले भोर, मावळ, मुळशी, जुन्नर या तालुक्यात काही घरांचं नुकसान झालं आहे. जोरदार वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडून गेले आहेत. अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरु आहे. या सगळ्या भागाला आधीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील मावळ तालुक्यातील काही भागांना चक्रीवादळाचा फटका बसलाय. मावळातील अनेक घरांचे यात नुकसान झालंय. काहींचे पत्रे उडालेत, काहींच्या भिंती कोसळल्या आहेत, काहींच्या घरांना तडे देखील गेलेत. काही ठिकाणी झाडपडीच्या घटना समोर येत आहेत.
कुत्र्याला लाथ मारायला गेला अन् रिक्षावाल्याचा सुटला रिक्षावरचा ताबा https://t.co/Pg3z3mzVGk
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021