चेन्नई : तमिळनाडूच्या कोयंबतूरमधील कमाचीपुरी आदिनाम मंदिरानं ग्रेनाइटनं बनलेली कोरोना देवीची मूर्ती बनवून पूजा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर व्यवस्थापकांपैकी एक सिवालिनेजेश्वर यांनी ‘पूर्वी कोलेरा आणि प्लेग सारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी देवीची पूजा केली गेली होती. लोकांना आजारांपासून वाचवण्याची ही परंपरा आहे. यापूर्वी प्लेगसह इतर काही इतर देवी-देवतांची मूर्ती तयार केली गेली होती, असं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात भयंकर प्रकार, पैशासाठी डॉक्टरने 3 दिवस केले मृत रुग्णावर उपचार https://t.co/UfhHZtCIYA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेपासून लोकांचे रक्षण व्हावं याकरिता डॉक्टर्स आणि वैज्ञानिक अथक परिश्रम घेत आहेत तसेच जगभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या सावटापासून सगळ्यांचीच सुटका व्हावी याकरिता काही ठिकाणी देवी-देवतांची पूजा-अर्चनाही सुरू आहे. तामिळनाडूतील कोयंबटूरमधील एका मंदिरात कोरोनाचा प्रादुर्भाव नष्ट व्हावा याकरिता ‘कोरोना देवी’ची स्थापना करण्यात आली आहे.
रुग्णांच्या नजरेत पत्रकार खलनायक, गिधाडे झालीत… (ब्लॉग)https://t.co/gppXOSWCid
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
तामिळनाडूतील इरुगुर येथे कमाचीपुरी अधिनाम नावाचे एक मंदिर आहे. या मंदिराच्या व्यवस्थापनाने लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता मंदिरात ‘कोरोना देवी’च्या मूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यांची अशी श्रद्धा आहे की, ‘कोरोना देवी’च कोरोना महामारीपासून जगभरातील लोकांचे रक्षण करेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दुसऱ्या लाटेत मृत्यूची संख्या वाढल्यामुळे कोरोनाच्या संसर्गापासून लोकांचे रक्षण व्हावे याकरिता मंदिर व्यवस्थापनाने काळ्या रंगाची ग्रॅनाईटपासून बनवलेली 1.5 फूटाची कोरोना देवीची मूर्ती मंदिरात स्थापन केली आहे.
हॉट अभिनेत्री सनी लिओनीमुळे एका कर्जबाजारी शेतकऱ्याला झाला फायदा https://t.co/WsLvIn7sMP
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
याबाबत अधिनाम मंदिराचे पुजारी शिवलिंगेश्वर यांचे म्हणणे आहे की, आजारांपासून लोकांचे रक्षण व्हावे याकरिता देवीची प्राणप्रतिष्ठा करण्याची इथली प्रथा आहे. यापूर्वीही ‘प्लेग मरियाम्मन’ आणि इतर देवींची स्थापना या मंदिरात केलेली आहे. त्यामुळे प्लेगसारख्या आजारात लोकांचे रक्षण झाले. त्याचप्रमाणे आताही मंदिरात ‘कोरोना देवी’ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
सोलापूर – ओडिसावरुन सोलापूरला अॉक्सिजन एक्सप्रेस दाखल, 93 मेट्रिक टन अॉक्सिजन दाखल, सोलापूरला 26 टन मिळणार, उर्वरित इतर जिल्ह्यांना..माहिती देतायत प्रांतअधिकारी हेमंत निकम #solapur #surajyadigital #oxygen #Express #सोलापूर #सुराज्यडिजिटलhttps://t.co/Wc8mkm9NlA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
या मंदिरात 48 दिवसांच्या महायज्ञाचे आयोजनही करण्यात आले आहे. यावेळी कोरोनापासून लोकांचे रक्षण व्हावे याकरिता विशेष प्रार्थनाही केली जाणार आहे. महायज्ञ पूर्ण झाल्यानंतरच भक्तांना कोरोना देवीचे दर्शन घेता येणार आहे.
सोलापूर मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांची तक्रार; पोलीसांकडून मारझोड, अपमान https://t.co/m3gwuXmFyH
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021