मुंबई : सध्या कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आहे हे जरी खरे असले तरी या कारणास्तव वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाइन घेणे नियमाला अनुसरून नाही आणि न्यायालयाने त्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे विद्यार्थी-पालकांनी ही बाब समजून घेऊन परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असं आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केलं.
आंतरराष्ट्रीय चहा दिवस ( 21 मे )
असा लागला चहाचा शोध… बापरे!!! जगभरात चहाचे एवढे प्रकार (ब्लॉग)https://t.co/0uSPazhOD8— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021
कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक विषयांच्या पदवी परीक्षा रद्द अथवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या आहेत. यावर आता वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनीही परीक्षा रद्द किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची मागणी केलीय. मात्र, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाइन घेणे नियमाला अनुसरून नाही आणि न्यायालयानेही त्यास परवानगी दिलेली नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी ही बाब समजून घेऊन परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.
सोलापूरकरांनी इंदापूरची खोडी काढलीय, आता आम्ही नाही गप्प बसणार, इंदापूर – बारामती रस्त्यावर काळ्या पट्ट्या बांधून रस्ता रोकोhttps://t.co/HeqkNgYv1H
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करणे, ऑनलाईन घेणे नियमानुसार सयुक्तिक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून १० जूनपासून होणाऱ्या परीक्षेला सामोरे जावे. परीक्षार्थींच्या आरोग्याची काळजी घेण्यात येणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh यांचे आवाहन pic.twitter.com/mtXffLwIbe
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 21, 2021
या संदर्भाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात देशमुख यांनी म्हटले आहे की, राज्यात कोवीड 19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 1 जूनपर्यंत लॉकडाऊन लागू आहे, त्यामुळे 2 जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या 10 जूनपासून घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कोवीड 19 प्रादुर्भावात वाढ न झाल्यास त्या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे नियोजन आरोग्य विद्यापीठ व वैद्यकीय महाविद्यालयांनी केले आहे, असे असताना या परीक्षा रद्द कराव्यात, त्या पूढे ढकलाव्यात किंवा त्या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात अशी मागणी काही विद्यार्थी करीत आहेत.
कोव्हॅक्सिनपेक्षा कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसनंतर जास्त अँटीबॉडी तयार होतात https://t.co/2I5sAhhTKW
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021
वास्तविक पाहता वैद्यकीय महाविद्यालयाकडून शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात डॉक्टर होवुन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत. अशा अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात भविष्यात काम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या विदयार्थ्यांच्या परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाईन घेणे संयुक्तीक ठरत नाही. केंद्रीय नियामक मंडळालाही ते मान्य नाही. शिवाय उच्च न्यायालयानेही ही बाब नाकारली आहे. त्यामुळे परीक्षा घेणे अनिवार्य ठरते आहे. एकंदरीत या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांनी आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करून परीक्षेला सामोरे जाणे हिताचे ठरणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक यांनीही या संदर्भाने विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करावे परीक्षेसाठी त्यांना प्रेरीत करावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.
ब्लॅक फंगसचा कहर; 5500 प्रकरणं आली समोर, देशात आतापर्यंत 126 लोकांचा मृत्यू, 70 टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रातhttps://t.co/oYN9bZVS2P
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 21, 2021