सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मार्ग काढण्यासाठी आपण राज्यभर दौरा करून तज्ज्ञांची मते जाणून घेत आहोत. समाजाला आरक्षण जर राजीनामा देऊन मिळणार असल्यास लगेच राजीनामा देईन, असे छत्रपती संभाजीराजे यांनी आज सोलापुरात सांगितले. कायदेशीर मार्ग काढण्यासाठी राज्यभर दौरा करुन मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर माझी भूमिका जाहीर करणार असल्याचेही सांगितले.
उजनी धरणाच्या गेटवर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा पुतळा जाळला https://t.co/sBigiW6Nqx
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
छत्रपती संभाराजे भोसले यांनी आज मराठा आरक्षणासंदर्भात उद्विग्न प्रतिक्रिया दिली. सोलापूरमध्ये ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माऊली पवार, ज्ञानेश्वर मुळे, श्रीकांत घाडगे आदी उपस्थित होते.
राज्य सरकारच्या हातातील लाभ सरकारने मराठा समाजाला द्यावेत, यासाठी 28 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असून तत्पूर्वी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
उजनी धरणाच्या गेटवर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा पुतळा जाळला (संतोष वाघमारे -टेंभुर्णी )#surajyadigital #ujjain #सुराज्यडिजिटल #जयंतपाटील #jayantpatil #पुतळा #status https://t.co/TA5BOjq4HY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील वर्डिंग्जचा अभ्यास राज्य सरकारने व्यवस्थित करण्याची गरज आहे. चुकीच्या पद्धतीने त्याचा अर्थ लावल्यास मराठा समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. धाराशिव, लातूर, नांदेडनंतर आता मी सोलापूर दौरा केला आहे. राज्यभर फिरत असताना मराठा, ओबीसीसह अन्य समाजातील तज्ज्ञांची चर्चा करून समाजातील त्यागी मंडळींचीही मते जाणून घेत असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी या वेळी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शांततेत सुरु असलेल्या आंदोलनांनी धारण केले उग्र स्वरुप, पंढरपूर तालुक्यात पेटली आंदोलनाची ठिणगीhttps://t.co/In7vrDsEqZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
माझा दौरा कोणत्याही पक्षाविरुद्ध अथवा सरकारविरोधात नसून समाजाच्या न्याय्य हक्कासाठी असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे दोन हजार 185 नव्हे तर आणखी खूप उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील तरुण अस्वस्थ, दु:खी झाला आहे. त्यांच्यासाठी राज्य सरकारच्या हातात जे आहे, ते त्यांनी तत्काळ द्यावे, अशी मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, लोकांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी मी हा दौरा सुरु केला आहे. राज्य आणि केंद्र सरकारने काय भूमिका घ्यायची ते पहावे लागेल. सारथी संस्थेची दुरावस्था किंवा वसतिगृहाचे प्रश्न प्रलंबित आहेत, त्याचे काम राज्याने करावे. माझी भूमिका पक्षाची नाही तर समाजाची असल्याचं संभाजीराजे यानी सांगितलं.
मराठा आरक्षण आंदोलन : भाजपची मोठी घोषणा https://t.co/JK61i2BREY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
* भाजपाच्या सुभाष देशमुख यांच्याकडे दाखवले बोट
केंद्रात भाजपाचे बहुमत आहे. त्याच बहुमताच्या जोरावर एका रात्रीत काश्मिरचे 370 कलम हटवले , राममंदिरचा मुद्दा एका रात्रित सोडवला , मग मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्रात बहुमताने का मंजूर होणार नाही? महाराज मराठे हिंदु आहेत अन केंद्रात सरकार हिंदुत्वादी विचारांचे आहे. मग मराठ्यांना आरक्षण मिळायला वेळ का, असा सवाल शिवव्याख्याते हर्षल बागल यांनी करताच छत्रपती संभाजी राजे यांनी हिंदुत्व म्हणताच भाजपाच्या सुभाष देशमुख यांच्याकडे बोट दाखवले. याक्षणी बैठकीत सर्वांना हसू आवरता आले नाही.
महाराष्ट्रात सोलापूरसह 14 जिल्ह्यांतील लॉकडाऊन वाढणार https://t.co/es598EEATJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021