पुणे : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात एक माथेफिरू चाहता अचानक घुसला आणि त्याने सोनालीच्या वडिलांवर हल्ला केला. ही धक्कादायक घटना पुण्यातील निगडी येथे सोमवारी घडली आहे. या प्रकरणी निगडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. अजय शेगटे असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने सोनालीच्या वडिलांवर चाकूने वार केले. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले.
संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या पुस्तकावर बंदी घाला – काँग्रेस https://t.co/Un9Zq8H8Ox
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
अलिकडेच विवाहबद्ध झालेली ‘नटरंग’फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निगडी येथील घरात ही घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोराने सोनालीच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. यात ते किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी निगडी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
'फ्लाईंग सिख' मिल्का सिंग यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल https://t.co/5KMxYvNnvO
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली कुलकर्णीच्या वडिलांचे पुण्यातील निगडी प्राधिकरण भागातील सेक्टर क्रमांक 25 येथे घर आहे. आरोपी अजय शेगटे सकाळी अचानक सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दारात आला. त्यावेळी सोनालीचे आई-वडील घरात होते. सोनालीच्या वडिलांनी अजयला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र माथेफिरु अजयने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत 63 वर्षीय मनोहर कुलकर्णी किरकोळ जखमी झाले आहेत. चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची तक्रार कुलकर्णींनी पोलिसांकडे दिली आहे.
"जे स्वतःला वाचवू शकले नाही ते कसले डॉक्टर", रामदेवबाबांचा आणखीन एक व्हिडीओ आला समोरhttps://t.co/6VxSlwMmEo
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
कुलकर्णींच्या इमारतीतील रहिवाशांना याची माहिती मिळताच त्यांनी अजयला पकडले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अजयला ताब्यात घेतले. अजयने आपण सोनाली कुलकर्णीचा फॅन असल्याचे सांगितले. निगडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
भोला 'पडोसन'!, सुनिल दत्त यांचा स्मृतीदिन (ब्लॉग)https://t.co/U7OfTD8G7u
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021