सोलापूर / मुंबई : राज्यात कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे भीषण परिस्थिती ओढावली आहे. या महामारीला रोखण्यासाठी राज्यभर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे अनेक सणांवर याचा परिणाम झाला आहे. कोरोनाच्या या संकटाचा परिणाम यंदाच्या आषाढी वारीवरही होणार असल्याची चिन्ह आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यासंबंधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उद्या शुक्रवारी (ता.२८) महत्त्वाची बैठक घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी #rain #surajyadigital #पाऊस #mumbai #हजेरी #सुराज्यडिजिटल #मुंबई pic.twitter.com/FwEv4oXwxX
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आणि पालखी सोहळा प्रमुखांची व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे एक बैठक झाली. त्यामध्ये सर्वच महाराज मंडळींनी पायी पालखी सोहळा काढावा अशी एकमुखी मागणी केलीय. यामुळे उद्याच्या बैठकीकडे महाराष्ट्रातील वारकरी आणि महाराज मंडळींचे लक्ष लागले आहे.
१ जुलै रोजी संत तुकाराम आणि २ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. परंतु, कोरोनामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. त्यामुळे यंदाही आषाढी पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आषाढी पायी पालखी सोहळा निघणार की, गतवर्षीप्रमाणे संतांच्या पादुका एसटी बसने पंढरपुरात आणल्या जाणार याकडे वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पश्चिम बंगालमध्ये 'यास' चक्रीवादळाचे थैमान, 15 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले https://t.co/C5e8ZHQYzN
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शेतकऱ्यांची फसवणूक करणा-या जलसंपदामंत्र्यांवर गुन्हा दाखल करा https://t.co/KMN4QFaEbH
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
मागच्या वर्षीच्या आषाढी वारीवरही कोरोनाचं सावट होतं. त्यामुळे वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आताही फेब्रुवारी महिन्यापासून अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने यंदाची वारीही रद्द होणार का? असा प्रश्न समोर येत आहे.
पंढरपूरच्या वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून माऊली दर्शनासाठी येत असतात. पायी चालत पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठी गर्दी असते. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठा हाहाकार माजला आहे. अद्यापही अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झालेली नाही. त्यामुळे यंदा वारीसंबंधी काय निर्णय घेण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
महाराष्ट्र – या 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईत पावसाची हजेरी, तीन दिवस पावसाची शक्यता
https://t.co/9HQctMmQZp— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
दरम्यान, मुंबईत फेब्रुवारी मध्यापासून अचानक वाढलेली रुग्णसंख्या आणि त्यास रोखण्यासाठी लावण्यात आलेले लॉकडाउनच्या निर्बंधांची मात्रा लागू पडली आहे. राज्यात सुरू झालेल्या निर्बंधांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे कोरोनामुक्तांच्या संख्यावाढीसह प्रतिबंधित क्षेत्रेही घटली आहेत. मुंबईचा विचार करता, काही महिन्यांपूर्वी धडकी भरविलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या गेल्या महिनाभरात झपाट्याने घटली आहे. केवळ एकाच महिन्यात प्रतिबंधित क्षेत्रे सात हजारांपेक्षाही अधिक कमी झाली आहेत. त्यामुळे १५ लाखांहून अधिक मुंबईकर प्रतिबंधित क्षेत्राच्या कचाट्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत.