मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आता सरकारवर गंभीर आरोप केला आहे. यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला. या ट्वीटमध्ये संभाजीराजे यांनी केंद्र की राज्य सरकार असा उल्लेख केलेला नाही. मात्र राज्य सरकारच्या इंटेलिजन्स विभागाकडून पाळत ठेवली जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
मराठा समाजाकरिता मोठी बातमी, मिळणार दहा टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ https://t.co/rH7wobvcLV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून राज्याचे राजकारण तापलं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असून त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. आता माझ्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचा दावा खुद्द संभाजीराजे यांनी केला आहे.
सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे.
माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही.
पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 31, 2021
संभाजी राजे यांनी ट्विट करून आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले की, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहित नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्यावर पाळत राज्य सरकार ठेवतयं की, केंद्र सरकार याचा उल्लेख ट्विटमध्ये केलेला नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मराठा आरक्षणाबाबत 6 जून, राज्याभिषेक सोहळा दिनापर्यंत ठोस भूमिका न घेतल्यास रायगडावरुन आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. याप्रसंगी आम्ही करोना वगैरे आम्ही बघणार नाही. त्यावेळी सर्वात पुढे मी असेन, असा थेट इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिला होता.
कोविडचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही, संभाजीराजेंची भूमिका अमान्य https://t.co/AeTG81RP41
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
* कोविडचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही, संभाजीराजेंची भूमिका अमान्य
मराठा आरक्षण मिळवण्यासाठी कोणता मार्ग हाताळायचा यावरून भाजपचे खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपमध्ये मतभेद समोर आले आहेत. तूर्तास संघर्ष न करता सरकारला सहकार्य करण्याची संभाजीराजेंची भूमिका आम्हाला अमान्य आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षण मिळवण्यासाठी कोणता मार्ग हाताळायचा, यावरून भाजपचे खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपमध्येच मतभेद असल्याचे समोर आले आहे. संघर्ष न करता सरकारला सहकार्य करण्याची खा. संभाजीराजे यांची भूमिका आम्हाला अमान्य आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाटील यांच्या या भूमिकेमुळे एकीकडे तर्कवितर्क लढवले जात असताना दुसरीकडे या मुद्द्यावरून भाजपमध्ये खा. संभाजीराजे एकाकी पडल्याचे चित्र आहे.
फडणवीस शरद पवारांना अचानक घरी जावून भेटले, चर्चांना उधाण, पत्रकार परिषद आटोपल्यानंतर फडणवीस घेतली भेट
https://t.co/gpgdrzq9Vd— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021