पुणे : पुणे शहरातील विकेंड लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. या बाबत आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार महापालिका हद्दीतील सर्व मद्यविक्रीची दुकाने आठवड्याचे सातही दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर नवे नियम हे पुढील १० दिवसांसाठी लागू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
बारामती जिल्हा परिषद सदस्येच्या पतीवर गोळीबार, परिसरात खळबळ https://t.co/u30lXqfSvg
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवार ते शुकवार या कालावधीत सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सर्व दुकाने सुरू राहणार आहेत. शनिवार रविवार अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मराठा समाजाकरिता मोठी बातमी, मिळणार दहा टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ https://t.co/rH7wobvcLV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
मद्यविक्रीची दुकानेही सकाळी ७ ते दुपारी २ सुरू राहणार आहेत. शहरातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरू राहतील. तसंच कृषी संबंधित सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, या आदेशांचं पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र : पुढील दोन तासात या ठिकाणी जोरदार पाऊस #rain #surajyadigital #पाऊस #maharashtra #TWOHOURS #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/i8YCgNqMML
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
दुपारी नंतर ३ अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई घालण्यात आली आहे. हॉटेल,जिम पुन्हा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच वाहतुकीदरम्यान होणारा करोना संसर्ग टाळण्यासाठी पीएमपी सेवाही बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेस्टॉरंट आणि बार फक्त पार्सल आणि घरपोच सेवेसाठी सुरू राहतील.
विद्या बालनच्या 'शेरनी' चित्रपटाचा टीझर रिलीज, पहा टीझर https://t.co/khfmh5tbOf
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021