सातारा / मुंबई : महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दमदार कामगिरी केलीय. सातारा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत फलटण ते म्हासुर्णे या रस्त्याचे काम सुरु आहे. या विभागाने काल 30 मे सकाळी 7 वाजेपासून ते आज 31 मे सकाळी 7 वाजेपर्यंत सलग 24 तास काम केले व तब्बल 39.69 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण केले. या कामगिरीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने नोंद घेतलीय. तसेच, अशोक चव्हाणांनीही कौतुक केले आहे.
पुणे : मद्यप्रेमींसाठी खुशखबर दारुची दुकाने आठवड्याचे सातही दिवस सुरु https://t.co/jTO54qiiSB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
सार्वजनिक बांधकाम विभागाने सातारा जिल्ह्यात राज्य मार्ग क्र. 147 वर सलग 24 तास काम करून तब्बल 39.69 किलोमीटर लांबीच्या एक लेन रस्त्याचे बिटुमिनस काँक्रिटीकरणाचं काम केलं आहे. सलग 24 तास काम करून एका बाजूचा रस्ता पूर्ण करण्याचा विक्रम सार्वजनिक बांधकाम विभागाने केलाय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बारामती जिल्हा परिषद सदस्येच्या पतीवर गोळीबार, परिसरात खळबळ https://t.co/u30lXqfSvg
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सातारा विभागामार्फत सध्या सातारा जिल्ह्यामध्ये राज्य मार्ग क्र. 147 फलटण ते म्हासुर्णे या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. काल रविवारी, दि. ३० मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत सलग 24 तास काम करून तब्बल 39.69 किलोमीटर लांबीच्या एका लेनचे बिटुमिनस काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या या कामगिरीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही नोंद घेतली आहे.
काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य निसटणार?; 25 आमदार दिल्लीत दाखल https://t.co/4SjnZfiXkY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामगिरीचं कौतुक खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनीही केलंय. हे काम करुन प्रकल्पाचे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राचा, देशाचा मान वाढविला आहे, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केलंय.
हा विक्रम अभिमानास्पद आहे. पण आपलाच विक्रम मोडून नवीन विक्रम नोंदवणे अधिक अभिमानाचे ठरेल. त्यामुळे पुढील काळात आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे वापरून नवे उच्चांक नोंदवण्याची, तसेच दर्जेदार व उत्तमोत्तम काम करण्याचे आमचे धोरण आहे व त्या दृष्टीने कामे करण्याचे निर्देश मी दिले आहेत. pic.twitter.com/VAAkUN05OV
— Ashok Chavan (@AshokChavan1958) May 31, 2021
आज एक नवीन विक्रम झाला म्हणून आम्ही इथेच थांबणार नाही. विक्रम रचणे ही एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र आपलाच विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित करणे, ही अधिक अभिमानास्पद बाब असते. त्यामुळे पुढील काळात आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणे वापरून आणखी नवे उच्चांक नोंदवण्याची, तसेच दर्जेदार व उत्तमोत्तम काम करण्याचे आमचे धोरण आहे. त्या दृष्टीने कामे करण्याचे निर्देश मी विभागाला दिले आहेत, अशी माहितीही चव्हाण यांनी दिलीय.