नवी दिल्ली : इंडियन स्कुल सर्टिफिकेट (ISC) बोर्डाच्या परीक्षा (बारावी) रद्द करण्यात आल्या आहेत. निकाल कसा लावणार, याविषयी अजून निकष ठरवण्यात आलेले नाहीत. लवकरच त्याविषयी घोषणा केली जाणार आहे. सीबीएसई बोर्डाने आज बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कौन्सिल फॉर द इंडियन स्कुल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (CISCE) हा निर्णय जाहीर केला आहे.
Government of India has decided to cancel the Class XII CBSE Board Exams. After extensive consultations, we have taken a decision that is student-friendly, one that safeguards the health as well as future of our youth. https://t.co/vzl6ahY1O2
— Narendra Modi (@narendramodi) June 1, 2021
सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. आजच्या बैठकीत केंद्रीय गृह, संरक्षण, वित्त, वाणिज्य, माहिती व प्रसारण, पेट्रोलियम व महिला व बालविकास मंत्रालय आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण विभागांचे सचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते.
फडणवीसांनी काल शरद पवारांची तर आज खडसेंची घरी जावून घेतली भेट, अजूनही खडसेंच्या मनात कुठेतरी भाजपच प्रेम दडलय ? https://t.co/RGbsyUjCwP
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
गेले अनेक दिवस यावर तोडगा निघत नसल्याने विद्यार्थी चिंतेत होते. या निर्णयामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आल्याचे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देशात उद्भवलेल्या करोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.परीक्षा रद्द झाल्यानंतर निश्चित मानकांच्या आधारे नियोजित वेळेत विद्यार्थ्यांचे मुल्यमापन केले जाणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे काही विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची इच्छा असल्यास परिस्थितीत अनुकूल झाल्यावर त्यांना सीबीएसईकडून पर्याय मिळणार आहे.
कोविडमुळे ऑपरेशन लोटस होणार नाही, आम्हाला वेळ नाही, कोरोनानंतर बघू – देवेंद्र फडणवीस #political #surajyadigital #DevendraFadnavis #operations #LOTS #सुराज्यडिजिटल #अॉपरेशनलोटसhttps://t.co/RzJ1rjiZIc
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
देशातील काही राज्ये प्रभावी मायक्रो-कंटेन्टमेंटद्वारे परिस्थिती हाताळत आहेत, तर काही राज्यांनी अजूनही लॉकडाउनचा पर्याय निवडला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक चिंतेत आहेत. त्यामुळे अशा तणावग्रस्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेस भाग घेण्यास भाग पाडता कामा नये असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
In view of the current status of the pandemic, projections that children are vulnerable to newer strains and the anxiety among them, the Maharashtra government had demanded that a "Non Examination Route" be considered for Std XIIth students.#cbseboardexams #CBSE #CBSEclass12 pic.twitter.com/cSVKrJWJxs
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 1, 2021
* महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्र्यांकडून निर्णयाचे स्वागत
विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही आपली कायम प्राथमिकता असायला हवी, असे म्हणत महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारच्या बारावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्यातल्या बारावीच्या परीक्षांबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना त्यांनी, ‘ घरी रहा आणि काळजी घ्या,’ असा सल्ला दिला आहे.
आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे केंद्राला सांगतील, चंद्रकांत पाटलांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर https://t.co/gRjoDkxtEq
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021