मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लागोपाठ घेतलेल्या दोन भेटीनंतर आता राजकारणात भेटीचं राजकारण आणखी वाढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची आज मुंबईतील घरी जाऊन भेट घेतली. राज्यातील राजकारणात सध्या सुरू असलेल्या भेटीगाठींच्या सपाट्यामुळं चर्चेला उधाण आलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना ही भेट झाल्यानं अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. हे तर्कवितर्क सुरू असतानाच फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. तिथं खडसे यांच्याशी त्यांचं बोलणं झाल्याचं भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी सांगितलं आहे.
आज मुंबईत @NCPspeaks चे अध्यक्ष आणि देशाचे नेते आदरणीय श्री शरदरावजी पवार @PawarSpeaks साहेबांची सदिच्छा भेट घेतली. शास्त्रक्रियेपश्चात त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. @samant_uday जी उपस्थित होते. pic.twitter.com/wTSgPug3jG
— Eknath Khadse (@EknathGKhadse) June 2, 2021
* काहीतरी नक्कीच घडतंय
या भेटीनंतर आज खडसे यांनी थेट मुंबईत येऊन शरद पवारांची भेट घेतली. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे त्यांच्यासोबत होते. खडसे यांनी स्वत: या भेटीबाबत ट्वीट केलं आहे. पवारसाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचं खडसे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मात्र, फडणवीस यांच्याशी बोलणं झाल्यानंतर लगेचच खडसे मुंबईत पोहोचल्यानं काहीतरी नक्कीच घडतंय असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या देशातील कोरोना संपला; सर्व निर्बंध हटवले https://t.co/8zYL3INJXF
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
* विरोधी पक्ष जमिनीवर येतंय
फडणवीसांच्या भेटीगाठीवरून शिवसेनेनं विरोधी पक्षावर खोचक टीका केली आहे. ‘लोकशाहीमध्ये संवाद असला पाहिजे. फडणवीस हे सत्ताधारी नेत्यांना भेटत असतील तर ते चांगलंच आहे. विरोधी पक्ष जमिनीवर येत असल्याचं ते लक्षण आहे. एक दिवस फडणवीस मातोश्रीवरही येतील,’ असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र – पुढील 3 तासात मुसळधार पाऊस #rain #पाऊस #surajyadigital #महाराष्ट्र #सुराज्यडिजिटल #Maharashtra pic.twitter.com/bwHExEHtto
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021