मुंबई : पुणे, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि विदर्भातील काही भागात पुढील 3 तासात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस होईल, अशीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबई आणि ठाण्यातही ढगाळ वातावरण आहे. दरम्यान केरळमध्ये येत्या 24 तासात मान्सून दाखल होण्याची अधिक शक्यता आहे.
एकनाथ खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, काहीतरी नक्कीच घडतंय https://t.co/rnhBoF6uhw
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
सध्या वातावरणातील बदलामुळे राज्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावायला सुरुवात केलीय. सध्या वातावरणातील बदलामुळे राज्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावायला सुरुवात केलीय. कालच मुसळधार पावसाने धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, बीड, लातूर, रायगड या जिल्ह्यांना झोडपून काढले, तर आज पुन्हा हवामान विभागाने इशारा देत, पुढील तीन तासात पुणे, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवलीय. त्यामुळे या कालावधित नागरिकांनी घरीच थांबावे, अशा सूचनाही हवामानच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्र – पुढील 3 तासात मुसळधार पाऊस #rain #पाऊस #surajyadigital #महाराष्ट्र #सुराज्यडिजिटल #Maharashtra pic.twitter.com/bwHExEHtto
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यावर अस्मानी संकट घोंघावतंय, त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झालेय. या महिन्यात पेरणी केलेल्या पिकांना या अवकाळीचा जबर फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे, त्यामुळे या कोरोनासोबतच अवकाळीचे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट निर्माण झालंय. जून महिन्याची वाट पाहत शेतकऱ्यांनी काही भागात पिकांची लागवड करुन घेतलीय. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सततच्या पावसामुळे बियाणं कुजण्याचे प्राण वाढलेय, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर हा देखील चिंतेचा विषय बनलाय.
'आयुक्त चले जाओ'चा नारा, महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर व्यापाऱ्यांचे उपोषण, उद्यापासून व्यापारचक्र सुरू होण्याचे संकेत !, अजित पवारांनी बोलावली आज बैठक https://t.co/7opvAdq7cJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
आज हवामान विभागाने पुणे, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर व विदर्भाला इशारा देत पावसाची शक्यता वर्तवली असून पुढील तीन तासात या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार आहे. काल देखील यातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे, त्यामुळे आज पुन्हा अस्मानी संकटाचा जिल्ह्यांना सामना करावा लागणार आहे. अद्याप मान्सून केरळच्या किनाऱ्यावरच न पोहोचल्याने मान्सूनचे आगमन काहीसे लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. त्यातच ‘यास’ चक्रीवादळाचा परिणाम जाणवू लागला आहे. पश्चिम भागांसह अन्य सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागते आहे.
टेंभुर्णीचे पीआय राजकुमार केंद्रेंचा पदभार घेतला काढून, मातंग महिलांना विष्ठा उचलायला लावलेले प्रकरणhttps://t.co/lfqBE5EjEQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021