टेंभुर्णी : पोलीस ठाण्यात बोलावून जबरदस्तीने आवारातील मानवी विष्ठा उचलावयास लावून अमानवीय कृत्य केल्याच्या घटनेची पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने दखल घेतली.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांचा पदभार काढून घेतला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची सोलापूर येथे नियंत्रण कक्षात नियुक्ती केली आहे. त्यांचा पदभार करमाळा विभागाचे पोलिस अधिकारी विषाल अहिरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
सोलापूर : लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी महापालिका गेटसमोर आंदोलन, दिलीप मानेंसह अनेकांना घेतले ताब्यात #solapur #lockdown #लॉकडाऊनhttps://t.co/vFtLpXTijm
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या आदेशानुसार २९ मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास १५ ते २० पोलीस कर्मचारी पाठवून पोलीस स्टेशनच्या कंपाउंड शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील महिला – तरुण मुली व पुरुष यांना बोलावून आवारातील साफसफाई करायला लावली होती.
पीआय राजकुमार केंद्रे यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करत पोलिसी बळाच्या जोरावर ठाण्यात शेजारील मांग वस्तीतील महिलांवर अन्याय अत्याचार करून मानवी व जनावरांची विस्टा घाण कचरा गोळा करायला लावून अमानुष व कायदेशीर कृत्य केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नवऱ्याची हत्या करुन बायकोने किचनमध्ये पुरला मृतदेह, प्रियकर फरार, मुंबईतील घटना https://t.co/OL8jcDBq8D
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
केंद्रेंचा पदभार करमाळा विभागाचे पोलिस अधिकारी विषाल अहिरे यांच्याकडे देण्यात आलेला आहे तर 48 तासात या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे त्यांनी सर्व दलित संघटनांना आश्वासन दिले आहे. केंद्रे यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा व त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी सर्व दलित संघटनांनी केलेली आहे जर कारवाई नाही झाली तर पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
जपान चंद्रावर पाठवणार रूप बदलणारा रोबो https://t.co/keZX2ZNivo
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
शनिवारी महिलांवर अमानवी कृती करायला लावल्याचे प्रकरण स्वतःच्या अंगलट येताच पोलीस वसाहत येथील निवासी पोलिसांच्या पत्नींची ढाल करून आपल्या बचावासाठी त्याचा वापर करण्याचा प्रकार दुर्दैवी व सामाजिक आणि जातीय तेड निर्माण करणारा आहे समाजात भेदभाव व संघर्ष याची विषवल्ली पेरू पाहणारी प्रवृत्ती राजकुमार केंद्रे यांची असून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत टेंभुर्णी येथील कार्यकर्ते मातंग एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे यांनी मांडले आहे.
आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे केंद्राला सांगतील, चंद्रकांत पाटलांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर https://t.co/gRjoDkxtEq
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
वाघमारे म्हणाले की, वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाज पोलीस ठाण्याच्या शेजारी वस्ती करून राहत आहे प्रत्येकाचे घरी शौचालय आहेत. कचऱ्याचा विल्हेवाट लावण्याच्या सोयी आहेत आजवर असा प्रसंग कधी उद्भवला नव्हता.