सोलापूर : सोलापूर शहरातील लॉकडाउन उठवून सर्व दुकाने, बाजारपेठा, उद्योगधंदे सुरू करण्याच्या मागणीसाठी आज बुधवारी शहरातील व्यापारी व लोकप्रतिनिधींनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी “आयुक्त चले जाओ’चा नारा देत परिसर दणाणून सोडले. या प्रकरणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर सोडून दिले.आंदोलनकर्त्यांना सदर बझार पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर मुक्तता केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चेनअंतर्गत राज्यात निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनवर भर देण्यात आला आहे. मात्र, या लॉकडाऊनचा अनेकांना फटका बसला आहे. आता तर सोलापुरात लॉकडाऊनच्या विरोधात व्यापाऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली. माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर व्यापाऱ्यांनी उपोषण पुकारले आहे.
टेंभुर्णीचे पीआय राजकुमार केंद्रेंचा पदभार घेतला काढून, मातंग महिलांना विष्ठा उचलायला लावलेले प्रकरणhttps://t.co/lfqBE5EjEQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
व्यापारी मृत्यूशय्येवर आहे, हे दाखवण्यासाठी एका व्यापाऱ्याला प्रतिकात्मकरित्या सलाईन लावून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला जात आहे. सोलापूर शहरात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असताना देखील केवळ नियमांमुळे प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये कोणतेही शिथिलता दिलेली नाही, असे येथील व्यापाऱ्यांचा आरोप आहे.
2011 च्या जणगणेनुसार सोलापूर शहराची लोखसंख्या ही 10 लाखाहून कमी आहे. त्यामुळे पालिकेले स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार नाही, असा दावा करत पालिकेने ग्रामीण भागातील आदेशच शहरात लागू केलेत. वास्तविकत: सोलापूर शहराची लोकसंख्या सध्या 10 लाखाहून अधिक आहे. तसेच शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा केवळ 2 ते 3 टक्के आहे. तसेच शहरात 55 टक्के ऑक्सिजन बेड देखील शिल्लक आहेत. त्यामुळे पालिकेने स्वतंत्र निर्णय काढून शहरातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. आम्हाला व्यापार सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
सोलापूर : लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी महापालिका गेटसमोर आंदोलन, दिलीप मानेंसह अनेकांना घेतले ताब्यात #solapur #lockdown #लॉकडाऊनhttps://t.co/vFtLpXTijm
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शासनाने 1 जूनपासून शहर टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाचे पालन न केल्याने व्यापारी आंदोलनाच्या पावित्र्यात होते. मंगळवारपासून व्यापारी एकेरी लाईन पद्धतीने (सम-विषम) आलटून-पालटून व्यवसायास परवानगी देण्याची आशा बाळगून होते. शासनाकडूनही तसा ग्रीन सिग्नल मिळण्याचे संकेत दिले होते. त्यादृष्टीने मंगळवारी दुकाने सुरू करण्याची तयारीही केली होती.
मात्र जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊनचे निकष कायम ठेवले. दुसरीकडे मनपा प्रशासनाने पुन्हा 15 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम करण्याचा आदेश मध्यरात्री काढला. त्याचबरोबर पोलिस प्रशासनानेही आंदोलनाची परवानगी नाकारली.
जपान चंद्रावर पाठवणार रूप बदलणारा रोबो https://t.co/keZX2ZNivo
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
आमदार संजय शिंदे, आमदार प्रणिती शिंदे , माजी आमदार दिलीप माने यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना लॉकडाउन उठविण्याबाबत साकडे घातले. महापालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, गटनेते चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे यांनीदेखील या मागणीसाठी पाठपुरावा केला. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने काल सायंकाळी लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यास परवानगी द्यावी, असे पत्र शासनाला पाठविले.
* अजित पवारांनी बोलावली आज बैठक
महापालिकेतील विरोधक आणि आजी-माजी लोकप्रतिनिधी व्यापाऱ्यांच्या बाजूने उभारले असून त्यांनी निवेदने देऊनही निर्णय न झाल्याने आज महापालिकेसमोर आंदोलन केले. तत्पूर्वी, आमदार प्रणिती शिंदे व आमदार संजय शिंदे यांनी त्यांच्या परीने वरिष्ठ स्तरावरूनच सकारात्मक निर्णय व्हावा, असा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासंदर्भात आज बैठक बोलावली आहे. मदत व पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
बार्शीरोडवर ट्रक – छोटा हत्तीचा अपघात, दोन जागीच ठार नऊजण जखमी https://t.co/zguSJmcAcK
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
* उद्यापासून व्यापारचक्र सुरू होण्याचे संकेत !
सोलापूर शहरातील व्यापारचक्र बहुदा उद्यापासून सुरु होईल, असे संकेत मिळत आहेत. आज स्थानिक लोकप्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांना तसेच मुख्यसचिवांना फोन करुन व्यथा मांडली आहे. तर पालिका प्रशासनाकडूनही सकारात्मक, असा प्रस्ताव कालच मंत्रालयात गेला आहे. यावर आज मंत्रालयातून मंजूरी मिळण्याचे संकेत आहेत. उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना असे फेरआदेश काढून सोलापूरातील लॉकडाऊन कालावधी कमी करुन सर्वच व्यापार पुन्हा सुरु होईल, या दृष्टीनं निर्णय घेण्यास सांगितल्याचे वृत्त आहे.